

महाराष्ट्रातील या नेत्यांना मिळणार केंद्रात मंत्रिपद
केंद्रात महाराष्ट्राला मोठा वाटा मिळण्याची शक्यता
फडणवीस यांनी घेतली शाह यांची भेट
केंद्र सरकारच्या सत्ता स्थापनेत महाराष्ट्राला मोठा वाटा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दोन तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला एक मंत्रिपद मिळू शकते. यावर राज्यातील नेत्यांची दिल्लीमध्ये खलबते सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळातील समावेशाबरोबरच देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यावरही चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
एनडीए मधील घटक पक्षांच्या बैठकीसाठी शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. या तिन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत केंद्र सरकारमध्ये समावेश होणाऱ्या राज्यातील नेत्यांच्या नावावर चर्चा झाली, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळात शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
….. गिरीश महाजन महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री?
फडणवीस यांनी घेतली शाह यांची भेट
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी प्रचंड प्रयत्न केले. पण देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर महाराष्ट्रात भाजपचा उपमुख्यमंत्री कोण असेल? असा मोठा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळातील समावेशाबरोबरच देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यावरही चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले नेते गिरीश महाजन यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. कारण सध्याच्या घडीला महाराष्ट्रात भाजपमध्ये गिरीश महाजन यांचं नाव आघाडीवर आहे. गिरीश महाजन हे सध्या राज्यातील भाजपचे दोन नंबरचे नेते आहेत. त्यांची पक्षाचे संकटमोचक नेते म्हणून ख्याती आहे. याशिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते आहेत.
केंद्रात महाराष्ट्राला मोठा वाटा मिळण्याची शक्यता… फडणवीस यांनी घेतली शाह यांची भेट…… गिरीश महाजन महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री?… इंडिगो सुरु करणार नागपूर-छत्रपती संभाजीनगर विमानसेवा… दोन शहरांमध्ये जलद आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा
आघाडीची विमान कंपनी इंडिगोने आज घोषणा केली की ती 2 जुलैपासून नागपूर ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान थेट विमानसेवा सुरू करणार आहे. ही नवीन सेवा मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही महत्त्वाच्या प्रदेशांना जोडण्यास मदत करेल आणि प्रवाशांना या दोन शहरांमध्ये जलद आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा देईल.
नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आणि विदर्भातील सर्वात मोठे शहर आहे, तर छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यातील एक प्रमुख सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर आहे. या दोन्ही शहरांमध्ये व्यापार, शिक्षण आणि पर्यटनासाठी मोठी मागणी आहे. इंडिगोची नवी विमानसेवा या वाढत्या मागणीला पूर्ण करेल आणि या दोन्ही शहरांमधील कनेक्टिव्हिटी आणि व्यापाराला चालना देण्यास मदत करेल. विमानसेवेची वेळापत्रक आणि तिकीट दर लवकरच जाहीर केले जातील.
राज्यात शनिवारी पावसाची शक्यता…. विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा येणार
प्रचंड उखाड्यामध्ये त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात आज शुक्रवारी व उद्या शनिवारी पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दक्षिण कोंकणात बहुतेक ठिकाणी, उत्तर कोंकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी व उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा , हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यामध्ये मोसमी पावसाचे आगमन झालेले आहे. पुढील तीन दिवसात मुंबईसह विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पाऊस धडकणार असून, शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणात एक दिवस आधीच मान्सून दाखल झालेला आहे. 6 जूनपासूनच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तळकोकणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या दोन ते तीन दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. साधारणता सात जून ही पावसाची तारीख असते. मात्र, एक दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाल्यानं आनंदाचे वातावरण आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे.
वनदेवीनगरात लाकडाचे टाल आगीत खाक
अंदाजे ५ लाख रुपयांचे नुकसान
वनदेवी नगर येथील लाकडाच्या टालला ५.५० वाजताच्या सुमारास आग लागल्याचा अग्निशमन विभागाला आला. मोठ्या स्वरुपाची आग असल्याने सुगतनगर अग्निशमन केंद्रातून दोन वाहने घटनास्थळाकडे पाठविण्यात आली. पथकाच्या जवानांनी तत्काळ कार्यवाही सुरू केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. सकाळी ११ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीत प्लायवूड मटेरियल, संगणक आदी जळून खाक झाल्याने ५ लाख रुपयांचे अंदाजे नुकसान नोंदविण्यात आले आहे. आगीचे कारण अज्ञात आहे.