WhatsApp : आता व्हॉट्सऍपद्वारे मिळवा मेट्रो तिकीट

0

•नागपूर मेट्रोच्या व्हॉट्सऍप तिकीट प्रणालीचे श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ

नागपूर(Nagpur) :-  दररोज व नियमित पणे मेट्रो प्रवाश्याची संख्या वाढत असून या वाढत्या रायडरशिप मध्ये कॅशलेस व्यवहारला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे याच शृखंलेत महा मेट्रोने नवीन व्हॉट्सऍप तिकीट प्रणालीचे शुभारंभ आज मा.केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व महामार्ग, भारत सरकार श्री. नितीन गडकरी(Mr. Nitin Gadkari) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार श्री. मोहन मते, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री.श्रावण हर्डीकर,जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,मनपा आयुक्त श्री.अभिजित चौधरी,महा मेट्रोचे संचालक(स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग)श्री.अनिल कोकाटे,संचालक (प्रकल्प) श्री. राजीव त्यागी उपस्थित होते.

विज्ञानाच्या क्षेत्रात सातत्याने प्रगती होत असून त्या मध्यमाने नवीन तंत्रज्ञान देखील नित्य-नेमाने उपलब्ध होत आहे. समाजातील तरुण आणि विद्यार्थी वर्ग या नवीन आयुधांचा मोठ्या प्रमाणात वापर करत असून या वर्गाने विशेषतः मह मेट्रोच्या या व्हाट्सएप तिकीट प्रणालीचा वापर करावा असे आवाहन महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री श्रावण हर्डीकर यांनी केले.

दररोज सुमारे ४०% मेट्रो प्रवासी मोबाइल ऍप, ऑनलाईन पेमेंट आणि महाकार्डसह सारख्या अनेक पर्यायाचा वापर करतात त्यामध्ये व्हॉट्सऍप तिकीट प्रणालीच्या माध्यमाने आणखी भर घालण्यात आली आहे. महा मेट्रोने नेहमीच तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले आहे. आतापर्यंत ८५ हजारपेक्षा अधिक नागरिकांनी महाकार्ड प्राप्त केले असून आहेत.सरासरी प्रतिदन १०० महा कार्ड खरेदी करत आहे. या व्यतिरिक्त पेमेंट करण्याकरिता क्यूआर कोडचा मोठ्या प्रमाणात वापर केल्या जात आहे.

त्यासोबतच महा मेट्रो द्वारे दर शनिवार आणि रविवारी महा मेट्रो मेट्रो प्रवाशांसाठी भाड्यात 30 टक्के सवलत महा मेट्रोच्या वतीने देण्यात येत असून या व्यतिरिक्त राजपत्रित सुटयांचा दिवशी देखील 30% सवलत मेट्रो प्रवाश्याना देण्यात येत आहे.

असे करा व्हॉट्सऍप द्वारे मेट्रो तिकीट बुक :

तुम्हाला QR कोड सर्व नागपूर मेट्रो स्टेशनवर ठेवलेले आढळतील, QR कोड स्कॅन करा किंवा +918624888568 या क्रमांकावर “Hi” लिहून पाठवा
एकदा तुम्ही QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला अधिकृत WhatsApp खात्यावर निर्देशित केले जाईल.
लिंक प्राप्त करण्यासाठी “Hi” म्हणा.
“आता बुक करा” वर क्लिक करा आणि तुमची बुकिंग लिंक उघडेल.
तुम्ही दिलेल्या स्थानकांच्या सूची मधून तुम्हाला कुठून प्रवास करायचा आहे ते निवडू शकता तुम्ही खाली दिलेल्या स्थानकांच्या सूची मधून तुमचे गंतव्यस्थान देखील निवडू शकता.
वेळ वाचवण्यासाठी”ऑनलाइनपे” निवडून तुम्ही तुमची पसंतीची पेमेंट पद्धत निवडू शकता.जर तुम्हाला डेबिट कार्ड द्वारे पेमेंट करायचे असेल तर तुम्ही इतर पेमेंट एक्सप्लोर करू शकता किंवा तुमचे पेमेंट करण्यासाठी UPI पेमेंट निवडणे सुरू ठेवू शकता
एकाधिक पेमेंट ॲप्लिकेशन पर्यायांमध्ये प्रवेश करण्यासाठी “आता पैसे द्या” वर क्लिक करा, तुम्ही तुमच्या पसंतीच्या कोणत्याही पेमेंट ॲप्लिकेशनद्वारे तुमचे पेमेंट पूर्ण करू शकता.
एकदा पेमेंट पूर्ण झाल्यावर, तुम्हाला व्हॉट्सॲपवर QR कोडसह तिकीट मिळेल, जे तुम्ही प्रवेश करण्यासाठी गेटवर स्कॅन करू शकता. हे सोपे, जलद आणि सोयीस्कर आहे.