Mahila Samman scheme:काय आहे ‘जागा दाखवा’ अभियान

0

मुंबई(Mumbai) , 18 ऑगस्ट, राज्य शासनाने महिलांना सर्व प्रकारचे एसटी बसमधून प्रवास करताना तिकीट दरामध्ये 50% सवलत दिली आहे. सध्या एसटीमध्ये “महिला सन्मान योजना (“Women Honor Scheme)” अंतर्गत लाखो महिला दररोज एसटीतून 50% तिकीट दरात प्रवास करीत आहेत. परंतु केवळ महिलांना तिकीट दरात सवलत देऊन चालणार नाही, तर योजनेच्या नावाप्रमाणे त्यांचा “सन्मान” देखील केला पाहिजे! या हेतूने अक्षरा केंद्र या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने एसटीने जागा दाखवा हा प्रबोधनात्मक संदेश सर्व प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचा व त्यातून जनजागृती करण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार प्रत्येक बसस्थानकावर, समाज माध्यमाच्याद्वारे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या कर्मचाऱ्यांना विविध चित्रफिती द्वारे महिलांचा प्रवासादरम्यान सन्मान करावा असा प्रभोधनात्मक संदेश दिला जाणार आहे.

बऱ्या चदा गर्दीचा गैरफायदा घेऊन सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः रेल्वे, लोकलचा प्रवास, एसटीचा प्रवास अशा ठिकाणी महिलांची छेडछाड केली जाते. त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. या विरोधात आवाज उठवणे अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना महिलांनी अशा प्रकारच्या गैरप्रकारांना वेळीच आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. धाडस दाखवलं पाहिजे. त्याबरोबरच अशा महिलांना सहकारी प्रवाशांनी देखील सहकार्य केलं पाहिजे, असा संदेश देणाऱ्या चित्रफिती आजपासून प्रत्येक बसस्थानकावर दाखवल्या जाणार आहेत.

Mahila Samman Savings Certificate Calculator
Government schemes for women 2024
Mahila Samman Saving scheme post office
Mahila Samman Saving Certificate How to apply Online
Mahila Samman scheme
Government scheme for housewife
Government Scheme for women
Mahila Samman Saving scheme interest rate