Shahbaz Building Collapse : ३ मजली इमारत कोसळण्यामागचं कारण काय ?

0

Shahbaz Building Collapse नवी मुंबई (New Mumbai), २७ जुलै : नवी मुंबईतील शहाबाज गावात एक ३ मजली इमारत कोसळली. ज्यामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. शनिवारी पहाटेच्या वेळी इंदिरा निवास नामक ही तीन मजली इमारत पत्त्यासारखी जमिनदोस्त झाली.

 

घटनेच्या वेळी सर्वजण साखर झोपेत असताना इमारतीला हादरे बसल्याने नागरिक बाहेर पडले, परंतु तीन जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. बचाव पथकांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन जणांना सुखरूप बाहेर काढले आहे, मात्र एकाचा शोध अद्याप सुरू आहे.

इमारतीत ३ गाळे आणि १७ फ्लॅट्स होते, आणि २०१३ मध्ये बांधलेली ही इमारत पहाटे अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली.घटनेची माहिती मिळताच, पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. इमारतीतील ४० लोक आणि १३ मुले सुरक्षित आहेत.

इमारत कोसळली
इमारत कोसळणे