

Increased security on India-Bangladesh border:गुवाहाटी (Guwahati), 07 ऑगस्ट : बांगलादेशातील अशांतता लक्षात घेता, गुवाहाटी येथील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) मुख्यालयातून भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सीमावर्ती भागात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये म्हणून सीमावर्ती भागात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. सर्व स्तरांवर कमांडर्सना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सैन्याची मोठी तैनाती करण्यात आली आहे आणि क्विक रिॲक्शन टीम्स (क्यूआरटी) तयार करण्यात आल्या आहेत पाळत ठेवण्यासाठी पीआरओने सांगितले की, सीमेवर बीएसएफच्या 11 बटालियन्स तैनात करण्यात आल्या आहेत. India-Bangladesh border
ते सर्व लँड कस्टम स्टेशन्सवर (एलसीएस) सखोल पाळत ठेवत असल्याचे बीएसएफने सांगितले. तसेच बॉर्डर चेक पोस्ट्स (बीओपी) वर तैनाती वाढवण्यात आली आहे. उपकरणांचा वापर करून देखरेख केली जात आहे. वास्तविक परिस्थितीची माहिती घेण्यासाठी गुप्तचर पथकेही तैनात करण्यात आल्याचे बीएसएफने म्हंटले आहे.