

धार्मिक सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस आयुक्तांनी घेतली बैठक
अमरावती (Amravati), 18 ऑगस्ट धार्मिक सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी अधिकाऱ्यांची सर्व बैठक घेऊन त्यांना महत्वाच्या सुचना दिल्या. शहरात कुठलीही घटना घडल्यास अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा जलद प्रतिसाद मिळाला पाहिजे, असे स्पष्ट आदेश दिले.
धार्मिक सण, उत्सव लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी डीसीपी, एसीपीसह सर्व ठाणेदारांची बैठक बोलावून त्यांना महत्वाच्या सुचना दिल्या. रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी, पोळा, मंगळागौरी असे सण येत्या काही दिवसात आहेत. बाजारपेठमध्ये खरेदीकरिता महिलांची गर्दी होईल.
सर्व ठाणेदारांनी अलर्ट असणे गरजेचे असून एखादी घटना घडल्यास क्विक रिस्पॉन्स मिळणे गरजेचे आहे, असे स्पष्ट आदेश दिलेत. तसेच शहरात सुरु असलेल्या अवैध हुक्का पार्लर व स्पा मसाज सेंटरबाबत माहिती घेऊन त्यांच्यावर त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.