
गडचिरोली जिल्हा येथे घडणाऱ्या नक्सली चकमकीच्या घटनांमुळे नेहमीच चर्चेत असतो. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या हल्ल्यात कधी नक्षलवाद्यांचे तर कधी शहिद झालेल्या पोलीस जवानांचे मृतदेह सापडतात, भारतात माओवादाची किंवा नक्षलवादाची सुरुवात पश्चिम बंगालमध्ये 1960 च्या दशकात झाली होती. (What is Naxalism in India) माओवाद्यांना नक्षलवादी असंही म्हणतात, पश्चिम बंगालमधील नक्षलबारी गावात चारू मुजूमदार यांनी तेथील जमीनदारांविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनालाच पुढे नक्षलवाद असं संबोधलं जाऊ लागलं. 70 च्या दशकात या आंदोलनाने अत्यंत उग्र रूप धारण केलं. सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे ही चळवळ उदयाला आली. ही चळवळ दडपण्याचा पोलिसांकडून अनेकदा प्रयत्न झाला. गेल्या काही वर्षांत माओवाद्यांचे अनेक गट तयार झाले. मध्य भारतातील अनेक भागात त्यांनी आपलं अस्तित्व प्रस्थापित केलं आहे. What is Naxalism in India
माओवाद्यांना नक्षलवादी असंही म्हणतात, पश्चिम बंगालमधील नक्षलबारी गावात चारू मुजूमदार यांनी तेथील जमीनदारांविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनालाच पुढे नक्षलवाद असं संबोधलं जाऊ लागलं. 70 च्या दशकात या आंदोलनाने अत्यंत उग्र रूप धारण केलं. सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे ही चळवळ उदयाला आली. ही चळवळ दडपण्याचा पोलिसांकडून अनेकदा प्रयत्न झाला. गेल्या काही वर्षांत माओवाद्यांचे अनेक गट तयार झाले. मध्य भारतातील अनेक भागात त्यांनी आपलं अस्तित्व प्रस्थापित केलं आहे.
झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, छत्तीसगढ, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या भागात या चळवळीचा मोठा प्रभाव आहे. देशातील 11 राज्यातील 90 जिल्ह्यांत ही चळवळ पसरली आहे, असं प्रशासनाचं मत आहे. मात्र, नेहमी धगधगणाऱ्या गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात आता हि चळवळ बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे. किंबहुना असंही म्हणता येईल कि गडचिरोली जिल्ह्यात ऍक्टिव्ह असलेली हि नक्सल चळवळ पोलिसांच्या कार्यकुशलतेमुळे जवळपास आता संपण्याच्या मार्गावर आली आहे याच उदाहरण म्हणजे माओवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातल्यावरही नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक देखील गडचिरोली जिल्ह्यात शांतपणे पार पडली आहे.
नक्षल घडामोडी व बातम्यांसाठी क्लीक करा
स्थानिक लोकांच्या पाठिंब्यानेच या नक्षलवादी संघटना मजबूत झाल्या आहेत अशा प्रकारची समाज होती त्यामुळेच पोलिसांना येथील नागरिक मदत करत न्हहोते मात्र पोलीस प्रशासन आणि सरकारच्या भूमिकेमुळे सध्याचं चित्र बऱ्याच प्रमाणात बदललं आहे. आयपीएस अधिकारी नीलोत्पल यांच्यामते स्थानिक लोकांच्या पूर्ण सहकार्यानंतरच ही परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आणणे शक्य होत आहे.
देश जरी आधुकीन आणि तांत्रिक दृष्ट्या सबळ होत असला तरी नक्सली मुमेंट मातुर पाहिजे तशी अडवान्स होऊ शकली नाही हे देखील हि मुमेंट ढासळण्याच्या मागचं एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे.
देशाच्या विकासात बऱ्याच प्रमाणात मागे राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सरकार आणि स्थानिक प्रशासनाने मोठ्या प्रमाणात विकासाची कामे हाती घेतली आहे त्यामुळे स्थानिक लोकांना शिक्षण , रोजगार , आणि पोलीस विभागास लागणाऱ्या अत्याधुनिक यंत्रणा देण्याच्या बाबतीत देखील सरकारच काम उल्लेखनीय असल्याचे पोलीस विभागाचे म्हणणे आहे.
गडचिरोली पोलीस विभागाचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मते आता देखील रेकॉर्डवरचे ९० आर्म कार्डर घनदाट जंगलामध्ये ऍक्टिव आहे. या सर्वांना आत्मसमर्पणाच्या मोहिमेत सहभागी होण्याची अपील देखील करण्यात आली आहे. गडचिरोली पोलिसांमार्फत राबविण्यात येत असलेल्या आत्मसमर्पणाच्या मोहिमेत भूखंडासह बऱ्याच सुविधांचा लाभ देण्यात आला आहे. माओवाद्यांनी या योजनेचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात यावे, असे आव्हान देखील गडचिरोली पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.
गडचिरोली पोलीस विभागाने स्थानिक ग्रामस्थांना कुठल्याही भूलथापांना बळी न पडता पोलीस विभागास सहकार्य करण्याची विनंती केली आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनेच गडचिरोली जिल्ह्याचा खरा विकास होणे शक्य असल्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले आहे.