Ninth National Convention of National OBC Federation :हंसराज अहिर यांनी आश्वासन देताना नेमकं काय सांगितलं

0

Ninth National Convention of National OBC Federation :राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नववे राष्ट्रीय अधिवेशन आज पंजाबमधील अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाच्या गोल्डन ज्युबिली कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले.

अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर (Hansraj Ahir, Chairman, National Commission for Backward Classes, inaugurated the convention) यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांचे नातू इंद्रजित सिंग खा. प्रतिभा धानोरकर, खा. नामदेव किरसान आ. परिणय फुके, सुधाकर अडबले ,महादेव जानकर, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवडे, सचिव सचिन राजूरकर, ओबीसी महासंघाचे संयोजक अशोक जीवतोडे यांची प्रमुख उपस्थित होती. या अधिवेशनात ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून आकडेवारी जाहीर करावी, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, बढतीत आरक्षण द्यावे, म. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावे यासह समाजाच्या विविध 30 मागण्यांच्या अनुषंगाने मंथन करून ठरावही पारित करण्यात आले.

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांना ठरावाच्या 30 मुद्द्यांचे निवेदन देण्यात आले. यापैकी आयोगाचे माध्यमातून उकल शकणाऱ्या मुद्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन हंसराज अहिर यांनी दिले.