
वाशिम – मराठा आरक्षण संदर्भातील अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी या करीता मनोज जरांगे पाटील हे अंतरावली सराटी येथे उपोषणाला बसले असून, त्यांची तब्येत अतिशय खालावली आहे यासंदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांना प्रश्न विचारला असता मराठा आरक्षणासाठी आधीच्या सरकारने काय काम केले असा सवाल खा श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे. कुणबी दाखले कधीचं एवढ्या मोठ्या प्रमाणात दिले गेले नव्हते. ते दाखले या सरकारने दिले आहेत. या संदर्भात हरकती मागविल्या असून, सध्या टेक्निकल काम सुरू आहे. मराठा समाजाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच पूर्ण केल्याचा दावा श्रीकांत शिंदे यांनी केला.