ज्येष्ठांच्‍या प्रलंबित मागण्या काय आहेत?

0

ज्येष्ठांच्‍या प्रलंबित मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे व उपोषण आयोजित

केवळ ज्येष्ठांनाच नव्हे तर सर्वच नागरिकांना त्यांच्या वाहनांचे नामांकन करण्याची सुविधा द्यावी, ही प्रलंबित मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली मान्य

नागपूर (NAGPUR), 1७ ऑगस्‍ट २०२४ :

ज्‍येष्‍ठांसाठी कॅबिनेट दर्जाचे स्‍वतंत्र मंत्रालय, ज्‍येष्‍ठांना राष्‍ट्रीय संपत्‍तीचा दर्जा म‍िळावा, सर्व ठेवींवर 1 टक्का अधिक व्‍याज दर व वीमा संरक्षण, ऑनलाईन मतदानाची सुविधा, वाढीव पेंशन, लाडकी बहिण योजना 65 वर्ष वरच्या गरजू महिलांना लागू करावी, गोठवलेला महागाई भत्ता द्यावा, वाहन नामांकनाच्या कायदा अंमलबजावणीसाठी आरटीओ ऑफिस मध्ये व्यवस्था व्हावी अश्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ, फेस्काम पूर्व विदर्भ, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान व सिनियर सिटीझन कौन्सिल नागपूर जिल्हा यांच्या संयुक्त कृती सम‍ितीच्‍या वतीने आज शनिवारी व्हेरायटी चौक, नागपूर येथे एक दिवसीय धरणे, निदर्शने आणि उपोषण करण्‍यात आले.

उद्या अर्थात सोमवारपासून प्रत्येक आरटीओ ऑफिसला जाऊन नवीन गाडी विकत घेताना त्याचा नॉमिनेशन फॉर्म भरला पाहिजे, त्याचं नामांकन झाले पाहिजे आणि यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन व्यवस्था सुरू करावी ही जागृती करणार आहोत अशी माहिती अॅड अविनाश तेलंग, सचिव, ज्येष्ठ ना. महामंडळ विदर्भ व संयोजक,संयुक्त कृती समिती यांनी दिली. याशिवाय सर्व ज्येष्ठांना सन्मानजनक वागणूक, ई पी एस 95 नियम लागू करणे, रेल्वे प्रवास सवलत अशा अनेक मागण्‍या अनेकदा पाठपुरावा करूनही पूर्ण न झाल्‍यामुळे संयुक्‍त समितीने आंदोलन तीव्र केले आहे असे देखील तेलंग म्हणाले.

एड अविनाश तेलंग, अध्यक्ष प्रभुजी देशपांडे, उल्हास शिंदे, दीपक शेंडेकर, नामदेव फटिंग, कृष्णराव खंडाळे, सुनील तांदुळकर, प्रमोद अंजनकर, डॉ पाखमोडे, सुधीर वाराणशीवार, राजाभाऊ अंबारे, बबनराव फालके, हेमंत शिंगोडे, विनोद व्यवहारे, प्रकाश मिरकुटे, श्रीराम दूरगकार, प्रकाश पाठक, व्रजराज कपाटे, अशोक भुताड, नीलकंठ सोनकुसरे, शामकांत पात्रीकर, मनोहर वानखेडे, ईश्वर वानकर, रामदास ठवकर, सुधीर शेकदार, मोहन झरकर अशोक बांदाणे, केशव शास्त्री, कमलाकर नगरकर, अशोक बेलसरे, भारत महाशबदे, सुभाष किनिकर, आणि शिवाय ४५ च्या वर सदस्य एक दिवसीय उपोषण आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनात सर्व ज्‍येष्‍ठ नागरिक मंडळाचे सभासद, पदाधिकारी, नागरिकांनी मोठ्या संख्‍येने सहभाग नोंदविला.

आंदोलन बैठक : यावेळी व्हेरायटी चौक नजीक जागेत ज्येष्ठ्यांच्या मागण्यानवर विस्तृत चर्चा झाली, प्रभुजी देशपांडे यांनी अध्यक्षीय भाषण केले आणि मागण्या पुर्ण होईपर्यंत संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला.श्री वसंत कळंभे, अध्यक्ष फेसकॉम यांनीही मार्गदर्शन केले.

लढ्याला यश : केवळ ज्येष्ठानाच नव्हे तर सर्वच नागरिकांना त्यांच्या वाहनांचे नामांकन करण्याची सुविधा द्यावी, ही आमची 2018पासूनची मागणी ना. श्री नितीनजी गडकरी यांनी पुर्ण केलेली आहे.आता सर्व वाहन विकत घेतांना आपल्याला नामांकन करता येईल.आज जे मालक आहेत त्यांना सुद्धा ऑनलाईन किंवा ऑफ लाईन नामांकन करता येईल. हे ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ या संघटनेचे मोठे यश आहे अशी प्रतिक्रिया एड अविनाश तेलंग यांनी दिली.