पुन्हा जनतेचा आशीर्वाद हवा आहे!

0

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

मागील तीन दशके देशसेवेचा ध्यास घेऊन भारतीय जनता पक्षाकडून राजकारणाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. याबद्दल मी माझ्या पक्षाचा कायम ऋणी आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी भाजपकडून आज जाहीर झालेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये मला पुन्हा एकदा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी देण्यात आली. रोजगार, शिक्षण, सिंचन, कृषी, आरोग्य या पंचसूत्रीनुसार पुन्हा बल्लारपूर मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आणि कल्याणासाठी पुर्ण शक्तीने काम करण्याकरिता जनतेचा आशीर्वाद हवा आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली.

सलग सातव्यांदा विधानसभा निवडणुक लढविण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहाजी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जे. पी. नड्डाजी, आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.