Manikrao Thakre यवतमाळ-वाशिममध्ये आम्हीच मजबूत स्थितीत-ठाकरे

0

यवतमाळ YAWATMAL  : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघावरील दावा काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे (MPCC President Manikrao Thackeray) यांनी व्यक्त केले आहे. एका वाहिनीशी बोलताना ठाकरे म्हणाले की, या मतदारसंघात काँग्रेस भक्कम स्थितीत आहे. विशेषतः शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या शिंदे गटात दाखल झाल्यावर काँग्रेसची स्थिती भक्कम आहे. त्यामुळे या मतदारसंघावरील दावा आम्ही सोडणार नाही. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव मोघे आणि मला फार कमी मतांनी पराभव पत्करावा लागला होता. आता उमेदवारी कुणाला द्यायची, याचा निर्णय पक्ष घेत असतो. त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही, असे ठाकरे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नियुक्तीवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात ठाकरेंनी नकार दिला. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवारांना सर्व राजकीय परिस्थितीची जाणीव आहे आणि त्याच परिस्थितीप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असावा, असे ते म्हणाले.