Wayanad landslides : भूस्खलानामुळे 36 जणांचा मृत्यू

0

वायनाडमध्ये भूस्खलानामुळे 36 जणांचा मृत्यू, 70 जखमी
Wayanad landslides: 

वायनाड (Wayanad), 30 जुलै  : केरळच्या (Kerala)वायनाड जिल्ह्यात भूस्खलनाच्या विविध घटनांमध्ये मृतांची संख्या 36 झाली आहे. तर सुमार 70 जण जखमी झाले आहेत. वायनाडमधील मेपड्डीच्या काही डोंगराळ भागात ही भूस्खलन झाले.स्थानिक आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान मदत आणि बचाव कार्य करत आहेत. पावसामुळे कठीण आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार, मेपड्डी येथे रात्री 2 वाजेच्या सुमारास दरड कोसळण्याची पहिली घटना घडली. यानंतर पहाटे 4 वाजून 10 मिनीटांनी पुन्हा भूस्खलन झाले. बचाव कार्यासाठी हवाई दलाची 2 हेलिकॉप्टर, एक एमआय-17 आणि एलएच सुलूरला पाठवण्यात आली आहेत. मेपड्डी येथील रुग्णालयात 16 जणांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (केएसडीएमए) सांगितले की, बाधित भागात अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. याशिवाय एनडीआरएफची अतिरिक्त टीम लोकांना वाचवण्यासाठी तैनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर कन्नूर डिफेन्स कॉर्प्सच्या दोन तुकड्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. या पथकांना वायनाडच्या दिशेने जाण्यास आणि बचाव कार्यात मदत करण्यास सांगण्यात आले आहे. केएसडीएमएने फेसबुकवर याबाबत पोस्टही केली आहे.

वायनाडमध्ये दरड कोसळल्यानंतर आरोग्य विभागाने जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी 8086010833 आणि 9656938689 हे दोन हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. व्यथिरी, कलपट्टा, मेपड्डी आणि मानंतवड्डी रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. सर्व आरोग्य कर्मचारी रात्रीच ड्युटीसाठी पोहोचले होते. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांची इतर पथकेही तैनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले की, बचाव कार्यात सर्व सरकारी यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. स्थानिक लोकांच्या मते परिस्थिती आणखी बिघडू शकते. त्याचबरोबर सततच्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात गुंतलेल्या पथकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असूनही लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जखमींसाठी पंतप्रधानांनी देवाकडे प्रार्थना केली आहे. या अपघातावर शोक व्यक्त करत पंतप्रधानांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट लिहिली आहे. पंतप्रधानांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशीही बोलून केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधानांनी मंत्री जॉर्ज कुरियन यांच्याशीही चर्चा केली आहे.दरम्यान, भारतीय हवामान खात्याने केरळच्या मलप्पुरम आणि कन्नूर जिल्ह्यांसाठी पुढील 24 तासांत इशारा दिला आहे. केरळमधील कोल्लम, अलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, थ्रिसूर आणि मलप्पुरम जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे 50 किमी प्रति तास आहे. इतर सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Wayanad landslide today
Chooralmala Wayanad

Wayanad in english

Wayanad wikipedia
Wayanad tourist places
Wayanad Resorts
Wayanad direction
Wayanad distance
Wayanad map
Wayanad is famous for