

अमरावती (Amravati) – अमरावती शहरातील मागासवर्गीय वस्ती असलेल्या यंकय्यापुरा येथे सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
भीम ब्रिगेड संघटनेच्या नेतृत्वात आज महिला व नागरिकांनी अमरावतीच्या मजीप्रा कार्यालयावर गेल्या दोन तासांपासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत पाणी देत नाही, तोपर्यंत हटणार नाही.
अशी भूमिका यावेळी नागरिकांनी रेटून धरली आहे. मागील एक वर्षापासून पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली. मात्र, अजूनही ती सुरू झाली नाही. तसेच रात्री एक वाजता पाणी पुरवठा केला जातो, तसेच नळाला बरोबर पाणी येत नसल्याने अनेक नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत मजीप्राचे कार्यालय सोडणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.