


३५ वी वरिष्ठ राष्ट्रिय सेपकटकरॉ स्पर्धा करिता अवधेश क्रिडा मंडळाच्या प्रांगणावर शिबीराचे आयोजन
वर्धा : ३५ वी राष्ट्रीय सेपकटकरॉ स्पर्धा २०२५ २६ पुरूष व महिला दि. २३ ते २७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये मनोहर पारीकर इंडोर स्टेडियम, मडगाव गोवा येथे होणार आहेत. या स्पर्धेकरिता दि. २५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या दरम्यान शिबीराचे आयोजन अवधेश क्रिडा मंडळ वर्धा च्या प्रांगणामध्ये करण्यात आले.
या शिवीराला संपुर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हयातुन खेळाडु आलेले आहेत. या शिबीरा करिता उत्कृष्ठ प्रशिक्षक म्हणून मनिपुर येथील महाविर शर्मा यांच्या उत्कृष्ठ मार्गदर्शना खाली शिबीर सुरू आहे. या शिबिरा अंर्तगत निवड झालेले खेळाडु महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतील. संस्थेचे सचिव विनय दि. मून, कबड्डीपटु दिवाकर मून , विंका मुन , कोषाध्यक्ष सुनील ढाले, दर्शन हस्ती, सोनाली भारोटे, रोमदेव बालपांडे, विभा मेश्राम, गणेश तिमांडे, मोसिम शेख, निखिल पोहनकर यांनी खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.
या शिबिरात पुरूष संघासाठी लेखंशु लडके, अनिकेत काळे, ओग गुळे, असांग जोंधळे, सुधेश कांबळे, क्षितिज सुर्यवंशी, रोहन फाड, काजी खाबील, अभिजित सावंत, योगेश ढगे, महेश साळवे, देवानंद त्रिकाळे, विनोद चव्हान, ज्ञानेश्वर ढोरे, राम पांडागळे, रात्रु रानेवाड, विजय बिजे, विलास बोंडले, अमन शेख, लतीफ सय्यद, अल्तमश पाशा, असांग जोनधळे यांचा सहभाग आहे.तर
महिला संघासाठी सोनल थडसे, रिया घरटे, पायल, प्रतीक्षा महाले, प्राची पार्टे, तपस्या माने, आर्या आचरे, धनश्री पवार, हंसिनी जवध, भक्ती चौधरी, प्रणिती नागणे, नम्रता सुळकुंडे, शिफा सय्यद, यांनी सहभाग घेतला आहे.