Jethanand Rajput संघाचे वर्धा जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांना मारहाण, एक युवक ताब्यात

0

वर्धा WARDHA- RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्धा जिल्हा संघचालक Jethanand Rajput जेठानंद राजपूत यांना एका टोळक्याने रात्री जबर मारहाण केल्याच्या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी रात्री एका युवकास ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.Wardha district leader of the Sangh, Jethanand Rajput, beaten up, a youth detained

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्याचे संघचालक असलेले जेठानंद राजपूत हे बसने वर्धेवरून हिंगणघाट येथे आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. बसमध्ये एका जोडप्याचा वाद सुुरु होता. तो वाद सोडविण्यासाठी राजपूत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यातून युवकाने राजपूत यांनाच शिवीगाळ केली. तो एवढ्यावर थांबला नाही तर त्याने आपल्या मित्रांना बसमधूनच फोन करून नांदगाव येथे बोलावून घेतले. तेथे एका ठिकाणी बस थांबवून राजपूत यांना खाली उतरविण्यात आले व तेथे दहा बारा जणांनी राजपूत यांना मारहाण केली. या प्रकरणी हिंगणघाट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच तणावाची परिस्थिती निर्माण झाली. संतप्त लोकांचा जमाव ठाण्याजवळ जमला. स्वतः पोलिस अधीक्षक ठाण्यात आले व त्यांनी जमावाला शांत केले. शहरात सुरक्षेचे उपाय म्हणून राज्य राखीव दलाची तुकडी मागविण्यात आली. दरम्यान, चौकशीत पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.