

वर्ध्यात बळिराजा रथ यात्रेचे उत्साहात स्वागत
विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा सहभाग
वर्धा : उमरी सावनेर नागपूर हुन निघालेल्या बळिराजा सन्मान रथयात्रेचे वर्धा येथे आज दुपारी १२.३० वाजता बजाज चौकात आगमन झाले. या रथयात्रेचे जिल्हा सर्वोदय मंडळ, किसान अधिकार अभियान आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांच्या वतीने रथयात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
अॅड. अविनाश काकडे, कॉ. यशवंत झाडे, ज्ञानेश्वर ढगे, सुदाम पवार, प्रा. प्रविण भोयर, भाई रजनीकांत आणि अनंतराव ठाकरे यांनी स्वागत केले.
यानंतर बळिराजा पदयात्रा शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली, जिथे मराठा सेवा संघाचे विरेंद्र कडू, अॅड. कपिलवृक्ष गोडघाटे आणि मयूर डफळे यांनी स्वागत केले.
यावेळी बळिराजा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे स्मरण करून सध्याच्या शेतकरी परिस्थितीवर मान्यवरांनी विचार व्यक्त केले.
रथयात्रेने पुढे आर्वी नाका व धुनिवाले चौक येथे अभिवादन करून नागपूरकडे प्रस्थान केले.
या प्रसंगी सर्व मानवतावादी कार्यकर्त्यांनी रथयात्रेच्या स्वागतासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक माननीय नखाते यांनी केले.