मतदान हे आमचे राष्ट्रीय आणि प्रथम कर्तव्य

0

पुणे(Pune), 13 मे आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा मतदान करायला मिळालं तेव्हा मला सर्वात जास्त आनंद झाला होता. तेव्हापासून कुठलीही निवडणूक असली तरी माझ्या घरातले कोणीही मतदान बुडवत नाही, मतदान हे आमचे राष्ट्रीय आणि प्रथम कर्तव्य आहे.. याची जाणीव आम्हाला आहे.. असं वक्तव्य सुबोध भावे यांनी केलं आहे.प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे पुण्यातील सिटी पोस्ट जवळील मतदान केंद्रावर पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क. सुबोध भावे यांनी अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा मतदान करायला मिळालं, तेव्हा मला सर्वात जास्त आनंद झाला होता. तेव्हापासून कुठलीही निवडणूक असली तरी माझ्या घरातले कोणीही मतदान बुडवत नाही, मतदान हे आमचे राष्ट्रीय आणि प्रथम कर्तव्य आहे. याची जाणीव आम्हाला आहे. राजकारणावर बोलणं टाळलं. जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा असं मी मतदारांना आवाहन करीन, कारण तुम्ही जर ठरवलं तरच बदल घडू शकेल” असं सुबोध भावे म्हणाला.