

कामत रेस्टॉरंट व समृद्ध भारत संपन्न महाराष्ट्रचा अनोखा उपक्रम
नागपूर (Nagpur), 15 नोव्हेंबर 2024: मतदान हा लोकशाहीचा पाया आहे आणि प्रत्येक पात्र नागरिकाने हे अत्यावश्यक राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले पाहिजे. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी नागपुरात अधिकाधिक मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी कामत रेस्टॉरंटच्या सहकार्याने समृद्ध भारत संपन्न महाराष्ट्रने जबाबदार नागरिकांना आवडत्या डिशवर 30 टक्के सवलत देण्याचा उल्लेखनीय उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाअंतर्गत, मतदानाचा पुरावा म्हणून मतदारांना त्यांच्या बोटावरचे शाईचे चिन्ह दाखवल्यानंतर कामत रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या आवडत्या पदार्थांवर 30% सवलत प्राप्त करता येणार आहे. ही खास ऑफर कामत रेस्टॉरंट, धरमपेठ टावर, शंकर नगर येथे सुरू असून निवडणुकीच्या दिवसापासून, अर्थात 20 नोव्हेंबर पासून ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत 10 दिवसांसाठी ही ऑफर वैध राहील.
कामत रेस्टॉरंट जागतिक स्तरावर त्यांच्या आदरातिथ्य आणि पाककलेसाठी प्रसिध्द आहे. लोकशाही बळकट करण्याच्या या प्रयत्नाला पाठिंबा देण्याचा कामत रेस्टॉरंटला सार्थ अभिमान आहे. नागपूरकरांनी निवडणुकीत उत्साहाने सहभागी व्हावे आणि त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि शेजारी यांनाही मतदान करण्यास प्रेरित करावे असे आवाहन कामत रेस्टॉरंट तर्फे करण्यात येत आहे.
“आम्हाला या लोकशाहीला मजबूत करणा-या या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचा एक भाग असल्याचा आनंद होत आहे. मतदान हा केवळ अधिकार नाही; ही एक जबाबदारी आहे आणि आम्हाला असे वाटते की, हा उपक्रम अधिक लोकांना बाहेर पडण्यास आणि मतदान करण्यास प्रवृत्त करेल. आमच्या धरमपेठ टॉवर्स रेस्टॉरंटमध्ये लोकशाहीचा हा सण साजरा करण्यासाठी आम्ही सर्वांचे स्वागत करतो. मुले आणि तरुण हे भविष्यातील जबाबदार नागरिक बनतील म्हणून बालदिन ते राष्ट्रीय युवा दिन हा उपक्रम घेण्यात येत आहे,” असे प्रतिपादन कामत रेस्टॉरंटचे अजय जयस्वाल यांनी केले.
‘समृद्ध भारत संपन्न महाराष्ट्र’ आणि कामत रेस्टॉरंट यांच्यातील हे सहकार्य लोकशाही मूल्ये जोपासण्यासाठी आणि नागरी कर्तव्याची भावना साजरे करण्याच्या दिशेने एक स्तुत्य पाऊल आहे. चला मतदान करूया, इतरांना मतदान करण्यासाठी प्रेरित करूया आणि आपली लोकशाही अधिक मजबूत करूया!
मिशन मोटिव्हेशनचे प्रताप काशीकर, राधाकृष्ण हॉस्पिटलचे गोविंद पोतदार, जितेंद्र शर्मा-संयोजक-परशुराम शोभायात्रा, कॉर्पोरेट वकील श्रीमती संगीता मिश्रा, हिलफॉर्ट पब्लिक स्कूल च्या संचालिका डॉ. परिणीता फुके आणि स्वोर्ड फार्माचे अतुल उरकुडे यांनी सर्वांना मतदान करावे व देशाला सुजलाम सुफलाम बनवावे, असे आवाहन केले.