

विमान प्रवासी वाहतूक क्षेत्रातील विस्तारा कंपनीचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण होत आहे. टाटा समूहाच्या मालकीच्या या पंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया 12 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे 12 नोव्हेंबर व त्यानंतरच्या तारखांसाठी विस्ताराचे बुकिंग केलेले 2.7 लाख प्रवासी एअर इंडियाने प्रवास करणार आहेत. ज्यांनी ‘विस्तारा’ची तिकिटे काढली आहेत, त्यांना एअरक्राफ्ट, क्रू आणि ऑनबोर्ड सर्व्हिसचा पूर्वीसारखाच अनुभव मिळेल, असे टाटा ग्रुपने सांगितले.
एअर इंडिया (Air India) आता डिजिटल बदलासाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी एअर इंडियाने पहिल्यांदाच पेटंट भरलं आहे. वन क्लिक बुकिंग सेवा सुरू केली जाणार आहे. जेणेकरून प्रवाशांना जास्त वेळा क्लिक करण्याची गरज पडणार नाही, असे एअर इंडियाचे मुख्य डिजिटल ऑफिसर सत्या रामास्वामी यांनी सांगितले.