
Shirdi Saibaba Sansthan : शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानने देणगीदार भाविकांसाठी नवीन ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली असून संस्थानच्या तदर्थ समितीने सुधारित देणगी धोरणास मान्यता दिली आहे.
Shirdi Saibaba Sansthan शिर्डी : देशासह जगभरातील साईभक्तांसाठी (Shirdi Saibaba) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानने देणगीदार भाविकांसाठी नवीन ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली असून संस्थानच्या तदर्थ समितीने सुधारित देणगी धोरणास मान्यता दिली आहे. या सुधारित देणगी धोरणानुसार देणगीदार साईभक्तांना आता प्रत्येक देणगी श्रेणीनुसार दर्शन व आरती पाससह प्रसाद, पूजेचे कुपन्स, आणि सन्मानचिन्हे यांचा लाभ मिळणार आहे. मोठ्या देणग्यांकरिता व्हीव्हीआयपी (VVIP) दर्शनासोबतच वस्त्र अर्पणाच्या संधी देखील मिळणार आहे, अशी माहिती संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.
श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
– 10,000 ते 24,999 रुपये देणगी: 5 सदस्यांसाठी एक वेळचा आरती पास, 5 उदी प्रसाद पॅकेट्स आणि 1 लाडू प्रसाद.
– 25,000 ते 50,000 रुपये देणगी : दोन वेळा आरती/दर्शन पास, 3 डी पॉकेट फोटो, 5 उदी, 1 साई चरित्र, 2 लाडू प्रसाद.
– 50, 001 ते 99,999 रुपये देणगी : 2 व्हीव्हीआयपी आरती पास, सन्मानचिन्हे, 5 उदी, साई सतचरित्र, 2 लाडू प्रसाद.
– 1 लाख ते 9.99 लाख रुपये देणगी : पहिल्या वर्षी 2 व पुढील वर्षांसाठी प्रत्येकी 1 व्हीव्हीआयपी पास, एक वेळचे वर्षातून मोफत दर्शन, सन्मान शॉल, 3 फोटो, पूजेचे कूपन, भोजन पास, वस्त्र व प्रसाद भेट.
– 10 लाख ते 50 लाख रुपये देणगी: प्रत्येक वर्षी 2 व्हीव्हीआयपी आरती पास, वर्षातून एक वेळ मोफत प्रोटोकॉल दर्शन, साईबाबांना वस्त्र अर्पणाची संधी, वस्त्र भेट, साई मूर्ती, पूजेचे कूपन्स, भोजन पास.
– 50 लाखांहून अधिक देणगी : आयुष्यभर दरवर्षी 3 व्हीव्हीआयपी आरती, दोन प्रोटोकॉल दर्शन पास, वस्त्र अर्पण, साई मूर्ती, सन्मान चिन्हे, भोजन पास
अंबाबाई, जोतिबा दर्शनासाठी आजपासून ड्रेसकोड लागू
दरम्यान, महाराष्ट्राचे कुलस्वामिनी कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू होणार आहे. मंदिर परिसरात येताना पारंपारिक कपडे किंवा पूर्ण अंग झाकल जाईल असेच कपडे घालून यावे लागणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी आजपासून ड्रेस कोडचे पालन करावं, असे आवाहन महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी केलं आहे. तोकडे कपडे घालून मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान समिती कडून सोवळयाची व्यवस्था केली जाणार असल्याचीही माहिती नाईकवाडे यांनी दिली आहे.















