

पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामीण भागात अवैध धंदे जोरात
शेगांव (Shegaon) :- स्थानिक शेगांव पोलीस हद्दीत येत असलेल्या ग्रामीण भागात सावरी गावात गाव खेड्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे जोरात सुरू असून इथे दिवसाढवळ्या सर्रासपणे सट्टा पट्टी अवैध दारू विक्री केली जाते.अवैद्य व्यवसाय शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच नवयुवक यांचे भविष्य अंधकारम होत असल्याचे भयानक चित्र दररोज समाजात पाहायला मिळत आहे .तेव्हा विद्यार्थी युवक वर्गाच्या भविष्याचा विचार लक्षात घेऊन सगळ्या अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रहारसेवक विनोद उमरे यांनी केली आहे.
सविस्तर असे आहे की.
गेल्या वर्षीपासून शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामीण भागात अवैध धंदे सट्टापट्टी अवैध्य दारू विक्री अवैद्य सट्टा पट्टी सर्रासपणे सुरू असून याची माहिती स्थानिक पोलीस पाटील संबंधित पोलीस प्रशासनाला दिली तरी पोलीस पाटील व पोलीस प्रशासन कसली कारवाई करत नाही यावर यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे. युवा विद्यार्थी तरुण वर्ग भविष्याचा विचार कोणी करताना दिसत नाही. तर आज ग्रामीण भागातील परिस्थिती पाहिली असता अनेक युवक कमी लागवडीमध्ये जास्त पैसा कमवायच्या मार्गी लागले आहे. व ओपन नेटच्या नादात मध्य प्राशन करून दारू पिण्याच्या मार्गी लागले असल्याचे भयानक चित्र पाहायला मिळत आहे. पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत येत असलेले ग्रामीण भागातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे. असे मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद उमरे यांनी केली आहे