
(Yawatmal)यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे. जिल्ह्यातील (Mahagav)महागाव तालुक्यातील (Anandnagar Tanda)आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले आहेत. या अडकेलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. भारतीय हवाई दलाचे २ हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहचणार आहेत. त्यानंतर अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच महागावसाठी रवाना होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. जिल्ह्यात अगदी कमी कालावधीमध्ये विक्रमी पाऊस बरसला आहे. यामध्ये यवतमाळमध्ये 236 मिलिमीटर, महागाव 231 मिमी, आर्णी 164 मिमी, घाटंजी तालुक्यात 142 मिमी पाऊस पडल्याची माहिती आहे.
आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहोत. प्रशासन यवतमाळमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. यवतमाळचे आमदार मदनभाऊ येरावार यांच्या देखील ते संपर्कात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. जिल्ह्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एसडीआरएफची दोन पथके बचावकार्यसाठी तयार करण्यात आली आहेत. यवतमाळमधील वाघाडी नदीला पूर आल्याने पुराचे पाणी थेट काठावर असलेल्या 50 ते 60 नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे घरातील धान्य कपडे इतर साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती आहे. जीव वाचवण्यासाठी काही जण घरावर चढले तर काहींनी काहींनी झाडांचा आसरा घेतला. जिल्ह्यातील दारव्हा, नेर, घाटंजी, पांढरकवडा, उमरखेड, बाभूळगाव-कळंब मार्ग बंद झाले आहेत. तिवसा (Karegaon Yavali)कारेगाव यावली, (Kotamba)कोटंबा, (Chani Kamathwada)चाणी कामठवाडा आणि (Naigaon)नायगाव या गावांना पुराचा वेढा पडला आहे. तर महागावच्या (Pananganga Shirphuli)पैंनगंगा शिरफुली, (Rahur) राहुर गावाचा संपर्क तुटला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे.