
अकोला AKOLA अकोला जिल्हातल्या सांगळूद बु.ग्रामपंचायत येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याचे पाईप लाईनचे काम सुरू होते. परंतु सदर कंत्राटदार यांनी काम व्यवस्थित केलेले नाही. अनेक ठिकाणी पाईप लाईन व्यवस्थित टाकलेली नाही.अनेक ठिकाणी पाईप लाइन फुटलेल्या स्थितीमध्ये आहे. दलित वस्तीमध्ये खोदकाम करून ठेवलेले आहे. पाईप लाईन निकृष्ट दर्जाची असल्याने ठिकठिकाणी दबलेली, फुटलेली आहे. त्यामुळे हे संपूर्ण काम बोगस झालेले आहे. काम पुन्हा दुरुस्त करून देण्यात यावे. या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यापासून वारंवार येरझारा मारूनही अधिकारी मिळत नाही. आजही अधिकारी उपस्थित नसल्याने छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रणजित काळे यांनी जीवन प्राधिकरणच्या उपविभागीय अधिकाऱ्याच्या खाली खुर्चीला निवेदन दिले.