नागपूरसाठी विकास ठाकरे तर रामटेकसाठी प्रकाश गजभिये दावेदार !

0

 

(Nagpur)नागपूर – नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने (City Congress President Vikas Thackeray)शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांना उमेदवारी द्यावी अशी एका बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मागणी पुढे केल्याने इतर दावेदारांची चिंता वाढली आहे. दत्तात्रय नगर येथील महाकाळकर सभागृहात काँग्रेसची पूर्वतयारी बैठक पार पडली. आ अभिजित वंजारी यांनी शहर काँग्रेसच्या देवडिया भवनातून निवडणूक सूत्रे सांभाळावी,जोमाने काम केल्यास विजय कठीण नाही असा दावा करण्यात आला. शहर अध्यक्ष आ विकास ठाकरे यांनी पक्षाकडून उमेदवारी कुणालाही मिळो आपण 1 मार्चपासून प्रचाराला लागावे, असे आवाहन केले. यावेळी गजराज हटवार ,संजय महाकाळकर, अतुल कोटेचा, प्रशांत धवड आदी उपस्थित होते.

रामटेकसाठी राष्ट्रवादीतर्फे (Prakash Gajbhiye) प्रकाश गजभिये

रामटेकचे  (MP Kripal Tumane Shinde)खासदार कृपाल तुमाने शिंदे गटात गेल्यानंतर नियमानुसार ती उमेदवारी त्यांनाच अपेक्षित असताना ही जागा भाजप स्वतःकडे घेण्याच्या प्रयत्नात आहे.

दुसरीकडे शिवसेना (Uddhav Thackeray)उद्धव ठाकरे गटातर्फे रामटेक मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे. काँग्रेसतर्फे या मतदारसंघात गेल्यावेळी लढलेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये पुन्हा एकदा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय कुणाल राऊत कामाला लागले आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे रवी भवन येथे एक बैठक पार पडली. या बैठकीत माजी आमदार प्रकाश गजभिये यांना उमेदवारी देण्यात यावी असा ठराव एकमताने पारित करण्यात आला. या बैठकीला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र जिप सदस्य सलील देशमुख यांच्यासह प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.एकंदरीत महायुतीत शिवसेना शिंदे गटाकडून रामटेक मतदार संघ भाजप आपल्याकडे खेचण्याच्या तयारीत असतानाच आता महाविकास आघाडीतही शिवसेना काँग्रेस की राष्ट्रवादी यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.