वीज निर्मिती मागणीनुसार -यशवंत मोहिते

0

साधारणपणे पावसाळ्यात विजेची मागणी कमी असल्याने वीज संचांच्या वार्षिक देखभाल, भांडवली दुरुस्तीची किंवा रखरखावची कामे महानिर्मितीतर्फे करण्यात येतात. मात्र यावर्षी पाऊस कमी पडल्याने/लांबल्याने ऐन पावसाळ्यात विजेची मागणी २६ हजार मेगावाट पर्यंत पोहचली, ही परिस्थिती देशभरात सर्वत्र जवळपास सारखीच आहे.

यंदा कोळसा खाण क्षेत्र भागात पाऊस झाल्याने कोळसा ओला होऊन त्याच्या उत्खननावर तसेच परिवहनावर विपरीत परिणाम झाला आहे.

महानिर्मितीचे व्यवस्थापन आणि वरिष्ठ अधिकारी वीज उत्पादनासाठी अधिकाधिक कोळसा मिळावा यासाठी कोळसा मंत्रालय, विद्युत मंत्रालय, रेल्वे मंत्रालय भारत सरकार तसेच कोल कंपन्या, रेल्वे आणि वाहतूकदार यांच्या सातत्याने संपर्कात असून व्ही.सी., बैठका आणि प्रत्यक्ष दौरे करून कोळसा आवक वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

दैनंदिन वातावरण, तापमान लक्षात घेऊन विजेच्या मागणी प्रमाणे सध्या महानिर्मिती आवश्यक तेवढे वीज उत्पादन करीत आहे. मागील चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक वीज उत्पादन झाले आहे. आज महानिर्मितीला १३८० मेगावाटचे बॅकिंग डाऊन सुरू आहे, कारण पावसाळी वातावरणामुळे विजेची मागणी कमी आहे.

(यशवंत मोहिते)
जनसंपर्क अधिकारी
महानिर्मिती, मुख्यालय मुंबई