
जिहादी मानसिकता ठेचण्याचा नामवंतांनी केला संकल्प
नागपूर (nagpur), १८ ऑक्टोबर
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण कलुषित करण्याचे निंदनीय प्रयत्न समाजातील विविध घटकांकडून सुरू आहेत. संकुचित राजकीय स्वार्थासाठी विविध समुदायांमधे भयंकर विद्वेष पेटवण्याचे आणि क्षुल्लक समाजिक मुद्यांवरून समाजात दुही निर्माण करून, भोळ्याभाबड्या जनतेला एकमेकांविरुद्ध लढवण्याचेही प्रयोग अहमहमिकेने सुरू आहेत. काही भागात जिहादी मानसिकतेने डोके वर काढल्यामुळे राज्यातील सामाजिक शांतता आणि सौहार्द धोक्यात आले आहे. या पृष्ठभूमीवर विदर्भासह महाराष्ट्रातील सज्जन शक्तीने ‘श्रेष्ठ महाराष्ट्र –विकसित महाराष्ट्र- सौहार्दयुक्त महाराष्ट्र’चा संकल्प सोडला असून, तो प्रत्यक्षात आणण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जनजागृतीसाठी ‘सजग रहो’ अभियान हाती घेतले आहे.
महाराष्ट्र ही शिवछत्रपतींची भूमी आहे. स्वधर्म, सुशासन आणि सामाजिक सौहार्द ही शिवछत्रपतींनी आपणा सर्वांना शिकवलेली सार्वकालिक सामाजिक मूल्ये आहेत. मात्र साऱ्या देशवासियांना शांतता, सौहार्द, प्रागतिकता आणि उत्कट देशभक्तीची प्रेरणा देणाऱ्या महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण दूषित करण्याचा निंदनीय प्रयत्न आज काही विभाजनकारी शक्ती करीत आहेत. काही अराजकवादी प्रवृत्ती सुशासनाच्या प्रयत्नांनाही सुरुंग लावीत आहेत, याकडे ‘सजग रहो’ अभियानात सहभागी झालेल्या नामवंत मंडळींनी राज्यातील अठरापगड जातींच्या लोकांचे लक्ष वेधले आहे.
गेल्या दहा वर्षापासून देशाची सर्व आघाड्यांवर महासत्ता होण्याकडे वेगवान वाटचाल सुरू झाली आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा यासाठी सर्व प्रकारचे प्रामाणिक प्रयत्न केंद्र आणि राज्य शासनांमार्फत होत आहेत. मात्र देशातील सर्वात विकसित प्रदेश असलेल्या, देशाचे ग्रोथ इंजिन असणाऱ्या महाराष्ट्रात ही वाटचाल रोखण्यासाठी विविध मार्गांनी बुद्धिभेद करण्यात येत आहे. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी शिवछत्रपतींनी महाराष्ट्रातील भिन्न जाती समूहांना एकत्र आणले. त्याच महाराष्ट्रात जातीय विद्वेष जाणीवपूर्वक पोसण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. कुठल्याही संवेदनशील नागरिकाने अस्वस्थ व्हावे, असे वातावरण राज्यात निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची बाब ‘सजग रहो’ अभियानातील बुद्धिवाद्यांनी अधोरेखित केली आहे.
या समाजद्रोही त्रिधारांना पायबंद घालीत महाराष्ट्र हिताच्या लक्ष्याची विकसित भारताच्या स्वप्नाशी सांगड सुनिश्चित निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘श्रेष्ठ महाराष्ट्र –विकसित महाराष्ट्र- सौहार्दयुक्त महाराष्ट्र’चा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्यात आरंभ करण्यात आलेल्या ‘सजग रहो’ अभियानास आपला सक्रिय पाठिंबा असल्याचे निवेदन विदर्भातील शंभरावर संत, महंत, धर्मगुरू, माजी कुलगुरू,उद्योजक, डॉक्टर्स, सीए, निवृत्त सरकारी अधिकारी, साहित्यिक, खेळाडू, बुद्धिवंत, ज्येष्ठ पत्रकार, समाजधुरीण, पर्यावरणवादी, शिक्षणप्रेमी, कृषीतज्ज्ञ, वैज्ञानिक, महिला नेत्री आणि सिव्हिल सोसायटी कार्यकर्त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
या अभियानामार्फत सुरू झालेल्या उपक्रमांना आमचा सक्रिय पाठिंबा असून, महाराष्ट्रातील सुजाण जनतेने तन-मन-धनाने या अभियानात सहभागी व्हावे, अशी विनम्र प्रार्थना या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये सर्वश्री ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. रवी कोल्हे (धारणी), पद्मश्री डॉ. स्मिताताई कोल्हे, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे (वाशीम), झाडीपट्टी कलावंत पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज (नागपूर), ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार प्रकाश महाराज वाघ, जनार्दनपंत बोथे (मोझरी, अमरावती), प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर (नागपूर), कुटुंब न्यायालयाच्या पूर्व न्यायधीश मीराताई खड्क्कार (नागपूर), संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे पूर्व कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, ज्येष्ठ निरुपणकार आणि लेखक विवेक घळसासी (नागपूर),
तरुण भारतचे माजी मुख्य संपादक लक्ष्मणराव जोशी (नागपूर), प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर गुप्त (नागपूर), प्रसिद्ध समीक्षक,ज्ये ष्ठ साहित्यिक डॉ. वि. स. जोग (नागपूर), कालिदास संस्कृत विद्यापीठ माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे (नागपूर), निवृत्त सेनाधिकारी, रक्षातज्ञ आणि लेखक कर्नल अभय पटवर्धन (नागपूर), सहकार चळवळीतील तज्ज्ञ रमेश मंत्री (नागपूर), ज्येष्ठ लेखक, विचारवंत विराग पाचपोर (नागपूर), प्रसिद्ध वक्ता, विचारवंत डॉ. कुमार शास्त्री (नागपूर), दैनिक तरुण भारतचे माजी मुख्य संपादक सुधीर पाठक (नागपूर), दैनिक जनमाध्यमचे संपादक प्रदीप देशपांडे (अमरावती), तरुण भारतचे प्रबंध संचालक धनंजय बापट (नागपूर), ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख (नागपूर), सेवाव्रती, संपूर्ण बांबू प्रकल्प, मेळघाट निरुपमाताई देशपांडे (लवादा), अ. भा. सहसंयोजक, भारतीय स्त्री शक्ती
डॉ. मनीषाताई कोठेकर (नागपूर), सुरमणी, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रा. कमलताई भोंडे (अमरावती), ज्येष्ठ लेखक, निवेदक प्रकाश एदलाबादकर (नागपूर), ज्येष्ठ कादंबरीकार शुभांगीताई भडभडे (नागपूर), ज्येष्ठ लेखिका आशाताई पांडे (नागपूर), ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. स्वानंद पुंड (वणी), प्रसिद्ध वक्ता प्राचार्य डॉ. अरविंदराव देशमुख (अमरावती), ज्येष्ठ कवी विष्णू सोळंके (अमरावती), प्रसिद्ध नाटककार, कवी श्रीपाद प्रभाकर जोशी (चंद्रपूर), प्रसिद्ध चित्रकार बसोलीचे प्रणेते चंद्रकांत चन्ने (नागपूर), ज्येष्ठ नाट्यकर्मी संजय भाकरे ( नागपूर), ज्येष्ठ ओडिसी नृत्यगुरू डॉ. मोहन बोडे (अमरावती), स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मंगला घिसाड, ओलावा फाऊंडेशनच्या मीरा कडबे (नागपूर), नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचच्या अध्यक्ष डॉ. कल्पना पांडे (नागपूर), वात्सल्य फाऊंडेशनच्या डॉ. संध्या पवार (नागपूर), ग्रामायण फाऊंडेशनचे अनिल सांबरे (नागपूर), दीनदयाळ प्रतिष्ठानचे नरहर देव (यवतमाळ), वक्ता व लेखक आशुतोष अडोणी (नागपूर), ज्य़ेष्ठ समीक्षक डॉ. राजेंद्र नाईकवाडे (नागपूर), ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष लोहे (आष्टी), शंखनादचे संचालक सुनील कुहीकर (नागपूर), लेखक सतपाल सोवळे (यवतमाळ), ज्येष्ठ कवी विवेक कवठेकर (यवतमाळ), भारतीय विचार मंचचे संयोजक सुनील किटकरू (नागपूर), विश्व संवाद केंद्र प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार चारुदत्त कहू (नागपूर), प्रसिद्ध वक्ता प्रा. डॉ. विजय राठोड (नागपूर), नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचाचे सचिव डॉ. प्रा. सतीश चाफले (नागपूर), लेखिका डॉ. छाया नाईक (नागपूर), अर्थतज्ज्ञ आणि बँकिंग तज्ज्ञ सुधाकर अत्रे (नागपूर), लेखक डॉ. सुमंत देशपांडे (भंडारा), ज्येष्ठ वित्रिज्ञ
अँड. सुमंत देवपुजारी (नागपूर), प्रसिद्ध विधिज्ञ अँड. पद्मा चांदेकर (नागपूर), महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अँड. पारिजात पांडे (नागपूर), विधिज्ञ अँड. रोहिणी ढोक, विधिज्ञ अँड. संगीता जाचक, शिक्षणज्ज्ञ डॉ. वंदना खुशालानी (नागपूर), सहकार तज्ज्ञ घनश्यामदास कुकरेजा (नागपूर), सहकार तज्ज्ञ विवेक जुगादे (नागपूर), दामोदर सारडा (चंद्रपूर), मधूसुदन रुंगठा (चंद्रपूर), डॉ. पार्थसारथी शुक्ल (अकोला), डॉ. ललित निमोदिया (यवतमाळ), सहकार तज्ज्ञ अजय मुंधडा (यवतमाळ), सुरेश राठी (यवतमाळ), प्रसिद्ध लेखिका प्रा. विजया मारोतकर (नागपूर), प्रसिद्ध लेखिका सना पंडीत (नागपूर), लेखिका आणि इंडोलॉजिस्ट डॉ. रमा गोळवलकर (नागपूर), अँड. आर. बी. अटल (अमरावती), भास्करराव टोम्पे (चांदूरबाजार), बांधकाम व्यावसायिक डॉ. श्रीनिवास वर्णकर (नागपूर), माजी प्र कुलगुरू रातुम नागपूर विद्यापीठ डॉ. संजय दुधे, माजी प्र. कुलगुरू महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ वर्धा डॉ. चंद्रकांत रागीट,
पुरुषोत्तम थोटे समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम थोटे (नागपूर), रातुम नागपूर विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. पांडुरंग डांगे,
शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रभुजी देशपांडे (नागपूर), आँरेंज सिटी हॉस्पिटलच्या संचालिका विलासिनी नायर (नागपूर), ज्ञानचंदजी गर्ग (अकोला) आणि नाना लोडम (अमरावती) यांचा समावेश आहे.