विदर्भातील या जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

0

तेलंगणा राज्यातील मुलुगु ठरले केंद्रबिंदू

रिष्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.३

Nagpur, ४ डिसेंबर: आज सकाळी ७.२७ वाजता तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू तिथे असल्याचे नोंदवले गेले. या भूकंपाचे सौम्य धक्के महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर, आणि यवतमाळ जिल्ह्यात देखील जाणवले.

रिष्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.३ अशी नोंद झाली आहे. सौम्य असले तरीही या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांनी याबाबत नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला आहे. “भूकंपाचे धक्के पुन्हा जाणवल्यास घाबरून न जाता इमारतीबाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित ठिकाणी जावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

भूकंपामुळे कोणत्याही मोठ्या नुकसानाची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही, मात्र प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी शांतता व सावधगिरी बाळगावी, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

तेलंगाना के मुलुगु में भूकंप से कांपी धरती, हैदराबाद तक दिखा असर, 5.3 थी तीव्रता

तेलंगाना के मुलुगु जिले में आज (4 दिसंबर) सुबह के झटके महसूस किए गए हैं. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र के मुताबिक रिक्टर स्केल पर इस भूकंप की तीव्रता 5.3 मापी गई है. भूकंप के झटकों के बाद अभी यह स्पष्ट नहीं हो पाया है कि इससे कितना नुकसान हुआ है.