नेहमी अडचणीत असताना विदर्भाने काँग्रेसला साथ दिली – वडेट्टीवार

0

 

(nagpur)नागपूर -काँग्रेस स्थापना दिनानिमित्त 28 डिसेंबर राजी संपूर्ण देशातून काँग्रेस कार्यकर्ते नागपूरात येणार, महारॅली सभा यशस्वी होईल अशी माहिती विधानसभा (Leader of Opposition Vijay Wadettiwar) विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. आज दिघोरीत होणाऱ्या सभेच्या स्थळाची वडेट्टीवार यांनी पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

नागपुरात १९२० मध्ये स्थापना दिवस सभा झाली होती. त्यानंतर आता 103 वर्षांनी सभा होत आहे. काँग्रेस अडचणीत असताना विदर्भाने नेहमीच काँग्रेसला साथ दिली – आमच्या वरिष्ठ नेत्यांनी वर्धापन दिन साजरा करायला संधी दिली.10लाख लोक देशभरातून येतील असे आमचे नियोजन सुरू आहे. विदर्भ,मराठवाडामधून लोक मोठ्या प्रमाणात येणार आहेत.
तेलंगणा, छत्तीसगढ मधूनही काँग्रेसजन सहभागी होणार असल्याने ही ऐतिहासिक सभा होईल, देशाला दिशा मिळेल.
लोकसभा निवडणूक बिगुल संदर्भात बोलताना आम्ही निवडणूक मोडवर आलो आहेत.लोकसभा निवडणूकीला फार कमी वेळ आहे, अश्या स्थितीत या सभेच्या माध्यमातून देशात संदेश देत आहोत. है तयार हम…
हुकुमशाही विरोधात

लोकशाही वाचवण्यासाठी, बेरोजगार तरुण,शेतकऱ्यांसाठी है तयार हम अशी ही टॅगलाईन असून राजकीय दृष्ट्या ही सभा महत्वाची असेल. विदर्भातून काँग्रेला ताकद मिळेल त्यासाठी या सभेचे महत्व राहील रामलल्ला संदर्भात उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर देव सगळ्यांचा असतो, कोणी बाजार मांडतो, कोणी श्रद्धा राखतो, आम्ही श्रद्धा ठेवणारे आहोत यावर
विजय वडेट्टीवार यांनी भर दिला.