विदर्भ राज्य आंदोलन समितीची शनिवारी बैठक

0

अमरावती, 15 डिसेंबर  : विदर्भ राज्य आंदोलन समितीची जिल्हा बैठक शनिवार, १६ डिसेंबर रोजी काँग्रेसनगर मार्गावरील ताजने सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे.विदर्भ राज्य आंदोलन समितीचा विदर्भ संकल्प मेळावा २० डिसेंबर रोजी अकोला येथे होणार आहे.

तसेच २७ डिसेंबर रोजी नागपुराती रिझर्व्ह बँक चौक येथे वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव चटप, संपादक प्रकाश पोहरे, विदर्भ राज्य महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामडे, अरुण केदार, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासूरकर उपोषणाला बसणार आहे. त्या संदर्भात ही महत्त्वपर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला माजी आ. वामनराव चटप मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विदर्भप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रंजना मामर्डे, राजेंद्र आगरकर, रियाज खान, दिलीप भोयर, सुनील साबळे, माधवराव गावंडे, चेतन परडके, सतीश प्रेमलवार, डॉ. विजय कुबडे, रहेमानभाई, अफसरभाई, मनोज पोपटानी, हर्षा सगणे, सरला सपकाळ, अशोक हांडे, बाबाराव जाधव, दिनकर निस्ताने, दिनेश ढवस, विष्णू काळमेघ, रविकांत आढाऊ, सुरेश जोगी, अनिल वानखडे, आशिष देशमुख, डॉ. निळकंठ यावलकर, पांडुरंग बिजवे, सचिन ढगे, गजानन दुधाट, इब्राहिम खाकसे, जानराव मनोहरे, दिगंबर चुनडे, रेखा माहोरे, धनराज गोटे, साहेबराव इंगळे, रामदास डवले यांनी केले आहे.