विदर्भ साहित्य संघ :ग्रंथ सहवास मध्ये “काव्य वसंत”चे आयोजन

0

आपल्या आगळ्यावेगळ्या, दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या विदर्भ साहित्य संघाच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही वसंत ऋतुच्या पर्वावर “काव्य वसंत” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमात नागपुरातील प्रसिद्ध कवी , सदाबहार अशा वसंत ऋतुच्या विभ्रमांची शब्दकळा आपल्या काव्यातून साकारणार आहेत . यात स्वाती सुरंगळीकर ,वृंदा जोगळेकर , शलाका जोशी, डॉ. अमृता इंदुरकर ,वेद घुळघुळे ,वृषाली देशपांडे, अभिषेक काणे ,आनंद देशपांडे ,जयश्री अंबासकर, प्रसन्न शेंबेकर ,धनश्री पाटील, रश्मी पदवाड, विनय मोडक ,मंदार मोरोणे आणि मेघा देशपांडे यांचा सहभाग असणार आहे.

तसेच शीतल काटे, अवनी काशीकर आणि शबरी पुराणिक या वसंत ऋतु वर आधारित गीतावर नृत्याविष्कार सादर करणार आहेत. ग्रंथसहवासचे संचालक प्रा. विवेक अलोणी यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते आणि सरचिटणीस विलास मानेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता विदर्भ साहित्य संघाच्या सीताबर्डी येथील ग्रंथ सहवास येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.