

मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी, साहित्यिक, लेखक, नाटककार, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य वि वा शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी दिनांक 27 फेब्रुवारी हा दिवस “मराठी भाषा गौरव दिन ” म्हणून साजरा केला जातो. त्या अंतर्गत विदर्भ साहित्य संघ “ग्रंथ सहवास “च्या वतीने आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने “स्मरण कुसुमाग्रजांचे” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी श्री सुनील शिनखेडे हे राहणार असून प्रमुख वक्ता म्हणून ज्येष्ठ लेखिका प्रेमाताई खांडवे या उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध नाट्य कलावंत विनय मोडक हे कुसुमाग्रजांच्या ” नटसम्राट” नाटकातील स्वगता यांचे अभिवाचन करणार असून लेखक आणि समीक्षक डॉ. राजेंद्र नाईकवाडे, ग्रंथालय संचालक प्रा. विवेक अलोणी आणि कवयित्री जयश्री अंबासकर हे कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन करतील. त्याचप्रमाणे आज राष्ट्रीय विज्ञान दिन असून याच कार्यक्रमात पर्यावरण तज्ञ सौ शेफाली यांचे दूधबडे यांचे “पर्यावरणात मानवी हस्तक्षेप” याविषयी भाषण होईल . या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.