

नागपूर(Nagpur): वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आज बुधवारी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी विदर्भवाद्यांनी आंदोलन केले. संविधान चौकात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जोरदार घोषणा दिल्या गेल्या.१ मे महाराष्ट्र दिन दरवर्षी विदर्भवादी काळा दिवस म्हणून साजरा करतात, आजही विदर्भवादी संविधान चौकात मोठ्या संख्येने एकत्र आले.वेगळ्या विदर्भाचा झेंडा हातात घेवून वेगळा विदर्भ झाला पाहिजे अशा घोषणा देत यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मागणी लावून धरली.यावेळी विदर्भ मागासलेला आहे असा आरोप अहमद कादर, विदर्भवादी यांनी केला.