

अटक बेकायदेशीर असल्याचा केला दावा
नवी दिल्ली(New Delhi), 29 मे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांचे निकटवर्तीय बिभव कुमार(Bibhav Kumar) यांनी आता दिल्ली पोलिसांच्या कारवाईविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या बिभव कुमारने दिल्ली पोलिसांची अटक बेकायदेशीर ठरवत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
यासोबतच बिभव कुमारने आपल्या याचिकेत असेही म्हटले आहे की, ज्या बेकायदेशीर पद्धतीने दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे ते कलम 41-ए चे उल्लंघन आहे. या याचिकेत बिभव कुमारने आपल्या बेकायदेशीर अटकेसाठी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.