‘या’ जिल्ह्यात काँग्रेसचे दिग्गज नेते पराभूत

0

अमरावती (Amravti) 24 नोव्हेंबर
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बळवंत वानखडे यांनी महायुती भाजपच्या नवनित राणा (BJP’s Navneet Rana)यांचा पराभव केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसची लाट येणार असा अंदाज होता. मात्रशनिवारला लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने या सर्व अंदाजावर पाणी फेरल्या गेले.

जिल्ह्यात काँग्रेसचा खासदार असताना सुद्धा निवडणूक रिंगणात उतरविलेल्या पाच पैकी एकाही उमेदवारालाविजय संपादित करता आला नाही. तर दर्यापूर ही जागा मित्र पक्ष शिवसेना उबाठाला सोडल्याने ती एक जागा महाविकास आघाडीला राखता आली.

विशेष म्हणजे जिल्ह्यात अमरावती सुलभा खोडके, दर्यापूर बळवंत वानखडे आणि तिवसामध्ये यशोमती ठाकुर असे तिन आमदार होते. यातील सुलभा खोडके या महायुतीत म्हणजे अजित पवारांच्या राकाँमध्ये गेल्या. दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे हे खासदार झाले. तर तिवस्यातील आमदार यशोमती ठाकुर (MLA Yashomati Thakur) यांना पराभवाचा सामना करावा लागला.

अमरावतीत यावेळी काँग्रेसने डॉ. सुनिल देशमुख यांना निवडणूक मैदानात उतरविले. त्यांचा राकाँ अजित पवार गटाच्या सुलभा खोडके यांनी ५ हजार ४९६ मतांनी पराभव केला.दुसरीकडे मेळघाटमध्ये तर भाजपच्या केवलराम काळे यांनी काँग्रेसचे नवखे उमेदवार डॉ. हेमंतचिमोटेयांचा १ लाख ६ हजार ८५९ मतांनी पराभव केला.

डॉ. चिमोटे यांना ३९११९ मते मिळाली. तिवस्यात माजी पालकमंत्री यशोमती ठाकुर (Yashomati Thakur) यांच्यावर पराभवाची नामुष्की आली. त्यांचा महायुती भाजपचे राजेश वानखडे यांनी ७९७४ मतांनी पराभव केला.अचलपूर मध्ये ग्रामीण कॉग्रेस चे अध्यक्ष बबलू देशमुख सुद्धा पराभूत झालेत. तर धामणगाव रेल्वे मतदार संघात वीरेंद्र जगताप यांना ही पराभवाचा सामना करावा लागला.