ज्येष्ठ व्यंगचित्रकार साहित्यिक मनोहर सप्रे यांचे निधन.

0
ज्येष्ठ व्यंगचित्रकार साहित्यिक मनोहर सप्रे यांचे निधन.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार साहित्यिक मनोहर सप्रे यांचे निधन.

चंद्रपूर (CHANDRAPUR): जेष्ठ विचारवंत, लेखक, काष्ठशिल्पकार आणि व्यंगचित्रकार श्री. मनोहर सप्रे (वय 92 वर्षे) यांचे आज राहत्या घरी, सरकार नगर येथे दुःखद निधन झाले. मनोहर श्रीधर सप्रे यांचा जन्म 4 जानेवारी 1933 रोजी खानदेशातील मजूर या खेड्यात झाला. तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्र या दोन विषयांत त्यांनी नागपूर विद्यापीठाची एम.ए. पदवी प्राप्त केली. प्राध्यापक म्हणून बावीस वर्षे कार्यरत राहिल्यानंतर त्यांनी समाजसेवेकडे वळत चंद्रपूर येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. अर्ध्या शतकाहून अधिक काळ त्यांनी व्यंगचित्रकलेत प्रचंड योगदान दिले. त्यांच्या व्यंगचित्रांची संख्यात्मक आणि गुणात्मक बाजू मराठी व्यंगचित्रकलेत लक्षणीय ठरली आहे. मात्र, त्यांनी केवळ चित्रं काढूनच थांबले नाहीत, तर व्यंगचित्रकलेचा आस्वादक आणि अभ्यासक म्हणून विपुल लिखाण केले. हे लिखाण मराठी व्यंगचित्रकलेसाठी एक अमूल्य ठेवा ठरले आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य, कला क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.