भाजीपाल्याचे भाव कडाडले

0

 

(Nagpur)नागपूर – पावसाळा सुरु होताच भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. सामान्य नागरिकांना भाजी खरेदी करताना खूप विचार करावा लागत आहे. (Price of tomato)टोमॅटोचा भाव 100 ते 120 रुपये प्रति किलो झाला आहे.(brinjal)वांगे,(Cucumber) काकडी,(Onions)कांदे, (Garlic)लसूण, शेंगा हे सगळे प्रत्येकी किलोला शंभरीपार गेले आहेत. परिणामी बाजारामध्ये भाजीपाला घेण्यासाठी बाजारात आलेल्यांकडून भाजीपाल्याचे भाव पेट्रोल पेक्षाही महाग झाल्याची प्रतिक्रिया कानी पडत आहे. विकासकामांचा गवगवा केला जातो, याबद्दल सरकार काहीच करत नाही आहे, यावर सरकारने काहीतरी ठोस उपाय योजना केल्या पाहिजेत, अशी सर्वसामान्यांची रास्त मागणी आहे. मजूर,शेतकऱ्यांना फायदा नाही राज्यात भाजीपाल्याचे दर वाढल्याने शहरी भागातील नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. मात्र भाजीपाला पिकवणाऱ्या बळीराजाला त्याचा फायदा होताना दिसत नाही.

टोमँटो, प्लॉवर, कोथंबीर, कोबी अशा सर्वच भाज्यांचे सध्या दर चांगलेच वाढले आहेत. ज्या वेळी भाज्यांचे दर वाढतात त्यावेळी आरडाओरडा केला जातो. मात्र एका शेतकऱ्याने चांगलेच उत्तर दिले आहे. कितीही रूपये किलोने विक्री होत असेल तरी आम्हाला किलो मागे फक्त दीड रूपया मिळत असल्याची धक्कादायक बाब या शेतकऱ्याने बोलुन दाखवलेली आहे. भरपावसात आम्ही काम करतो लेबर, उत्पादन खर्च, मेहनत, निर्सग या सर्व गोष्टी विचारात घेतल्या तर काय उरते? हे ही शहरातील आमच्या बांधवांनी भाजीपाला खरेदी करतान पहावे आणि मगच भाव वाढला अशी ओरड करावी असे प्रांजळ मत या शेतकऱ्याने व्यक्त केले आहे.