नागपूर विद्यापीठात वीर बाल दिवस संपन्न

0

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
जनसंपर्क विभाग

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात वीर बाल दिवस संपन्न

(Nagpur)नागपूर : (२६-१२-२०२३)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात वीर बाल दिवस संपन्न झाला. वीर बाल दिवस हा श्री गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादास बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या हौतात्म्याचे प्रतीक आहे. साहिबजादांच्या साहस आणि धैर्याची लहान थोरांना माहिती होण्यासाठी सरकार देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात साहिबजादास बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या प्रतिमेला सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक श्री. गणेश कुमकुमवार यांनी माल्यार्पण केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागातील यूडीसी श्री. शैलेश राठोड, योगेश केवटे, रुपेश आत्राम, कवडू भोयर, अनिल खरे, आसिफ शेख, कार्तिक हरडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.