

नागपूर[Nagpur], 10 जून
वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून मरार टोली ग्राउंड शिवमंदिर येथे स्त्री सशक्तीकरण उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महिला मोर्चा अध्यक्ष प्रगती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित महिलांना प्रगती पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
प्रगती पाटील म्हणाल्या, सावित्रीच्या पौराणिक कथेतील निष्ठा आणि समर्पणाच्या भावनेने प्रेरित होऊन आजही अनेक स्त्रिया हा सण साजरा करतात. असे असले तरी स्त्री शिक्षण व सामाजिक सुधारणांसाठी झटणा-या सावित्रीबाई फुले यांचा आदर्शदेखील महिलांना ठेवला पाहिजे. सावित्रीबाईंचे विचार समानता, शिक्षण आणि महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारे असून त्यांची प्रतिमा प्रत्येकीने आपल्या घरी लावून तिचे पूजन करावे व त्यांचा आदर्श आत्मसात करावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
या कार्यक्रमाला सुचिता नशीने, कविता सरदार, विशाखा जोशी, राखी शिंगारे, कल्पना गजबे, सुचित्रा नशीले, साधना पापड़कर, सिमरन कौर, कविता केळवदे, रोशाली बावनकुळ, कविता मेश्राम ,प्रीती कश्यप, श्वेता ठाकूर, नीता नेवारे, आरती मसराम, रूपल दोडके यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.