

लांजेवार कुटुंब आणि अंभृणी सेवा संस्थेचे आयोजन
नागपूर (nagpur), 1 ऑक्टोबर
लांजेवार कुटुंब आणि अंभृणी सेवा संस्था, नागपूर प्रस्तुत ॲड. अविनाश लांजेवार यांच्या जन्मदिवसाप्रीत्यर्थ आशयघन कथाकथन स्पर्धेचे सोमवारी आयोजन करण्यात आले. शेवाळकर सभागृहात रामायण आणि महाभारत यांवर आधारित पार पडलेल्या या स्पर्धेत वत्सल कपाले यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
प्रगती वाघमारे यांना द्वितीय तर गोविंद साळफे यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष पुरस्कारासाठी ऋत्विज पुंड ह्यांची निवड करण्यात आली.
दोन फेऱ्यांमध्ये आलेल्या या स्पर्धेत प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी 15 स्पर्धकांची निवड करण्यात आली. पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे होते तर परीक्षणाची जबाबदारी डॉ. स्मिता होटे व प्रीती वडनेरकर यांनी सांभाळली.
असिधारा लांजेवार बोहटे यांनी यावेळी ‘रश्मी रथी’ चे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असिधारा लांजेवार बोहटे यांनी केले तर अंभृणी सेवा संस्थेच्या अध्यक्ष डॉ. रत्नप्रभा अंजनगावंकर लांजेवार यांनी आभार मानले. या स्पर्धेसाठी अंभृणी सेवा संस्थेचे सचिव स्वप्नील बोहटे, स्वधा लांजेवार यांचे विशेष सहकार्य लाभले.