विदर्भ साहित्य संघात ‘वसंतोत्सव’

0

नागपूर (Nagpur)-साहित्य, संगीत आणि ललितबंध यांचा अनोखा कार्यक्रम ‘वसंतोत्सव’चे आयोजन विदर्भ साहित्य संघाद्वारे 11एप्रिल रोजी अमेय दालन, वि. सा. संघ, सीताबर्डी येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्‍यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि. सा. संघाचे अध्‍यक्ष प्रदीप दाते तर सरचिटणीस विलास मानेकर यांची प्रमुख उपस्‍थ‍िती राहील. सुरुवातीला वसंत वाहोकर यांच्‍या ‘काव्य लेणे वसंताचे’ हे कविसंमेलन होणार असून यात प्रसन्न शेंबेकर, जयश्री अंबासकर, महेंद्र पेंढारकर, डॉ. वसुधा वैद्य, डॉ. तीर्थराज कापगते, सुषमा मुलमुले, अजय चिकाटे, आनंद देशपांडे, मनीष सावळापूरकर, प्रशांत पनवेलकर यांचा सहभाग राहील. सूत्रसंचालन धनश्री पाटील करणार आहेत.

दुस-या भागात ‘वसंत पल्लवी’ या ललित बंधाचे वाचन प्रा. विवेक अलोणी व सना पंडित करणार असून ‘वसंत बंध’ या कार्यक्रमात धनश्री धारकर कवितांचे अभिवाचन करतील. त्‍यानंतर होणा-या ‘वसंत बहार’ या कार्यक्रमात वसंत प्रभू, वसंत देसाई, वसंत पवार व डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या संगीत रचना मुकुल पांडे, निकेता जोशी, राधा ठेंगडी सादर करणार आहेत. त्‍यांना डॉ. राजेंद्र डोळके, परिमल जोशी वाद्यसंगत करणार असून निवेदन वृषाली देशपांडे यांचे राहील. या वसंतोत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन वि.सा. संघाच्या कार्यकारी मंडळाने केले आहे.