देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरात विविध सामाजिक उपक्रम

0

 

आ. किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिर, पालकमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते उद्घाटन

चंद्रपूर (Chandrapur) :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार, चंद्रपूर महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्षा छबु वैरागडे, भाजप नेते प्रकाश देवतळे, माजी महापौर राखी कंचर्लावार, संजय कंचर्लावार, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, युवा मोर्चा शहराध्यक्ष मयुर हेपट, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, महामंत्री मनोज पाल, सविता दंढारे, मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, स्वप्निल डुकरे, अॅड. सारिका संदुरकर, प्रदीप किरमे, ओबीसी आघाडी अध्यक्ष विनोद शेरखी, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष राशिद हुसेन, अॅड. सुरेश तालेवार माजी नगरसेवक देवानंद वाढई, माजी नगरसेविका कल्पना बबुलकर, पुष्पा उराडे, वंदना तिखे, विठ्ठल डुकरे, अरुण तिखे, सायली येरणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पालकमंत्री उईके म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानातून प्रेरणा घेत समाजाभिमुख कार्य करणे हे आपले कर्तव्य आहे. मोदींचा वाढदिवस हा केवळ औपचारिक उत्सव नसून तो सेवा सप्ताह म्हणून साजरा केला पाहिजे. रक्तदानासारखा सामाजिक उपक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा आहे.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishore Jorgewar) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सर्व क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडत आहेत. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपण स्थानिक पातळीवर समाजहिताचे कार्य करण्याचा संकल्प केला पाहिजे. रक्तदानासारखे उपक्रम केवळ एखाद्या गरजूचे प्राण वाचवतातच नाहीत, तर समाजात सेवा आणि बांधिलकीची भावना दृढ करतात असे ते म्हणाले.

रक्तदान शिबिरासोबतच शहरातील विविध धार्मिक स्थळी स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमेत भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. तसेच यावेळी अनेक युवतींनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थिती भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अॅड. सुरेश तालेवार यांनी रक्तदान शिबिराचे प्रमुख म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.