
निवेदनामार्फत नागपूर महानगरपालिकेमध्ये आंदोलन करण्याच्या इशारा
नागपूर महानगरपालिका अंतर्गत असलेली आपली बस मधील कामगारांच्या विविध मागण्याला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट ) यांनी नागपूर महानगरपालिका आणि कंत्राटदार यांना निवेदनामार्फत येणाऱ्या 22.09.2025 नागपूर महानगरपालिकेमध्ये आंदोलन करण्याच्या इशारा दिला होता. या आधी सुद्धा दिनांक 04.09.2025 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून एक दिवसाचे काम बंद आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी एका कंत्राटदाराने एक वर्षाचा पी एल कामगाराच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने इतर कंत्राटदारांना सुद्धा लवकरात लवकर पी एल टाकण्याची विनंती केली होती परंतु कंत्राटदार मागणी पूर्ण करण्यास विलंब करत होते. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे वर्ष 2017 पासून प्रलंबित असलेला पी एल कामगारांना देण्यात आला. नागपूर जिल्हा अध्यक्ष शिवराज बाबा गुजर , शहराध्यक्ष अनिल अहिरकर, शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, विवेक वानखेडे कार्याध्यक्ष (कामगार सेल) , राकेश घोसेकर (सल्लागार) यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. विवेक वानखेडे आणि राकेश घोसेकर यांनी महानगरपालिकेमधील पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी महानगरपालिकेमध्ये कामगाराची शिष्टमंडळ भेटण्यात आले व त्यांच्या आभार मानण्यात आले यामध्ये
सतीश नायर, रुपेश पडोळे, चंद्रशेखर गजभिये, रुपेश निकोसे, सुरेंद्र मानकर, प्रकाश कोरमकर, सुमेध पाटील, फईम शेख, असलम खान, प्रणय गजापुरे, अशपाक शेख, समीर चातारकर, मनोज शुक्ला, भूपेंद्र शुक्ला, राजेश गाढवे, रमेश गजघाटे, सचिन वर्धे, राजेश मामुलकर, संजय कळसकर, चिंतेश्वर बहिंडवार, निलेश वैद्य, हिमांशू करकाडे, अशोक दक्ष, अश्विन बिचवे, मुन्ना शेख, उमेश वंजारी, मोहन कांबळे, निखिल जगनाथ उपस्थित होते