वंदे मातरम करीअर फॉर नेशन साठी आज ही प्रेरक

0

वंदे मातरम गीताच्या दीडशे वर्षपूर्ती निमित्त भव्य कार्यक्रम — ४५०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नागपूर(Nagpur): वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या वर्धापनदिनानिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) नागपूर, मुलींची आयटीआय नागपूर, एससीपी आयटीआय नागपूर तसेच बुटीबोरी आयटीआय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात नागपूर शहरातील सुमारे ५० शाळांमधील ४५०० विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण म्हणजे ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन, ज्यात हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र स्वर साधून देशभक्तीचा झंकार घडविला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. पी. टी. देवतळे, सहसंचालक, प्रादेशिक कार्यालय नागपूर , उपस्थित होते. तर डॉ. समय बनसोड यांनी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना वंदे मातरम गीताचा इतिहास, अर्थ आणि त्यामागील देशभक्तीची प्रेरणा समजावून सांगितली. या कार्यक्रमाला संत भागीरथी महाराज यांचे विशेष उपस्थिती होती.
नागपूरचे तहसीलदार संतोष खांडरे व धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे हे सुद्धा मान्यवर म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात दीनानाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर दोन गीते सादर केली. तसेच आयटीआय नागपूर व मुलींची आयटीआय नागपूरच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारित सुंदर लघुनाटिका सादर करून उपस्थितांना भावविभोर केले.

डॉ. समय बनसोड यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम व सामाजिक बांधिलकी याबद्दल विचारप्रवर्तक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पि. टी. देवतळे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात देशसेवा करण्याचे आणि भारताबद्दल अभिमान बाळगण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली व समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. प्रास्ताविक सौ. श्वेता कुलकर्णी, उपसंचालिका, औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिगंबर पुंड, प्राचार्य, मुलींची आयटीआय नागपूर यांनी केले. उत्कृष्ट सूत्रसंचालनाची जबाबदारी साहेबराव गुडधे यांनी समर्थपणे पार पाडली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागपूरमधील सर्व शासकीय आयटीआय संस्थांचे गटनिदेशक, निदेशक व कर्मचारी वर्ग यांनी मनापासून परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध स्पर्धांचे निकाल कार्यक्रमादरम्यान जाहीर करण्यात आले व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.