
अकोला AKOLA – वंचित बहुजन आघाडी प्रणित अकोला जिल्हा मातंग समाजाच्या वतीने अकोला येथील मातंग समाज 14 वर्षीय अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टमध्ये चालविण्यात यावे आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी आणि पिडीत मुलीचे शिक्षण व कुटुंबाचे पुर्नवसन करण्यात यावे, व पिडीत मुलीला व कुटुंबाला कायमस्वरूपी संरक्षण द्या, या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडी प्रणित अकोला जिल्हा मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. प्रभा शिरसाट (जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन महिला आघाडी ) प्रामुख्याने उपस्थित होत्या.