बहुजनांच्या हितासाठी वंचित आघाडी हाच पर्याय

0

 

राजेश बेले (Rajesh Bele)यांचे प्रतिपादन

चंद्रपूर (Chandrapur),
संपूर्ण राज्यात सत्तेपासून वंचित राहिलेल्या बहुजनांना सत्तेच्या दालनापर्यंत घेऊन जाण्याची मनीषा मनात बांधून राजकारणात उतरलेली वंचित बहुजन आघाडी हाच बहुजन समाजासाठी सत्ता आणि विकासाचा एक सर्वोत्तम पर्याय असल्याचे मत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेले राजेश बेले यांनी व्यक्त केले आहे.

शंखनाद वृत्त वाहिनीशी बोलताना राजेश बेले यांनी, या मतदारसंघातील काँग्रेस व भाजपा उमेदवाराच्या कार्यपद्धतीवर टीका केली. काॅंग्रेस उमेदवाराच्या घरून फक्त दारूचा व्यवसाय झाला व यांनी स्वतःचे बंगले बांधले. यापलीकडे मतदारसंघाचा थोडाही विकास त्यांना करता आलेला नाही. हीच परिस्थिती भाजपा उमेदवाराची देखील आहे. तीस वर्षे आमदार असूनही त्यांना देखील या जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर नेता आलेले नाही, असा आरोप राजेश बेले यांनी केला आहे.
या परिस्थितीत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीचा एक उत्तम पर्याय मतदारांसमोर उपलब्ध आहे. त्यालाच नागरिकांनी संधी द्यावी असे आवाहन देखील राजेश बेले यांनी केले आहे.