Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात मोठी माहिती उघड

0

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवीच्या आत्महत्येच्या दिवसापर्यंत हगवणे कुटुंबियांकडून तिचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.Vaishnavi Hagawane Death Case : सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. आता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात (Vaishnavi Hagawane Death Case) सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीला कुटुंबियांकडून मारहाण करण्यात आल्याची माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून (Postmortem Report) समोर आली आहे. तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Police) आज शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने (Court) पती शशांक सासू लता आणि नणंद करिष्मा या तिघांना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

मारहाणीचे 29 पैकी 6 व्रण ताजे

वैष्णवी हगवणेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येच्या दिवसापर्यंत हगवणे कुटुंबियांकडून तिचा छळ करण्यात आला आहे. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीला हगवणे कुटुंबियांकडून मारहाण करण्यात आली आहे. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे एकूण 29 व्रण आहेत, त्यातील ५ ते ६ व्रण ताजे असल्याचे उघड झाले आहे. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीचा हगवणे कुटुंबियांकडून छळ झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे.

हगवणेंची बँक खाती गोठवली

तर हगवणे कुटुंबीयांचे सर्व बँक पोलिसांनी गोठवले आहेत. वैष्णवीचे सोने का तारण ठेवले आणि त्यातून येणाऱ्या रकमेचे हगवणे कुटुंबीयांनी काय केलं? याचा तपास अद्याप बाकी आहे. तसेच फरार आरोपी निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबीयांचा संबंध पोलिसांना तपासायचा आहे. पोलिसांना हगवणे कुटुंबीयांची एकत्र चौकशी करायची आहे, त्यामुळे हगवणे कुटुंबियांची पोलीस कोठडी वाढवण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली.

पोलीस कोठडीत वाढ

तसेच वैष्णवी हगवणेच्या अंगावर असलेले व्रण म्हणजेच तिला ज्या हत्याराने मारहाण केली त्या हत्यारांचा अद्याप तपास लागलेला नाही. ते हत्यार नेमके ठेवले कुठे आहेत? याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. यासाठीही पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली. यावर न्यायालयाने पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा या तिघांना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांची पोलीस कोठडी सुद्धा 28 तारखेपर्यंत आहे.