

विष्णू जी की रसोई येथे पार पडली मोदक स्पर्धा
नागपूर:-विष्णू जी की रसोई येथे पार पडलेल्या मोदक स्पर्धेत उकडीचे मोदक गटात वैशाली पुजारी यांनी तर तळलेले मोदक गटात मेघना परांजपे विजेत्या ठरल्या.
उकडीचे मोदक अंजनी साठे यांनी तर तळलेले मोदक गटात कविता देशमुख यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. नावीन्यपूर्ण मोदक गटात स्नेहल गोतांगले यांनी प्रथम तर रश्मी तिजारे या द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. प्राजक्ता चौधरी व स्नेहल डगवाल यांनी उत्कृष्ट सजावटीसाठी पुरस्कृत करण्यात आले.
उकडीचे, तळणीचे आणि नाविन्यपूर्ण मोदक अशा तीन गटात पार पडलेल्या या स्पर्धेत 50 हून अधिक स्पर्धक सहभागी झज्ञले होते. स्पर्धकांनी घरून मोदक तयार करून आणले होते. मोदकाची चव, सादरीकरण, सजावट व संकल्पनेच्या आधारावर स्नेहल दाते, अनुराधा हवालदार, कविता गावंडे, सुजाता नागपुरे यांनी परीक्षण केले. विजेत्यांना प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते पुरस्कार तर सहभागींना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जथे यांनी केले.