वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता

0

दहा वर्षांच्या लढ्याला अखेर यश

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता

जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांनी मानले आभार

नागपूर: प्रसिद्ध जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांच्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले आहे. त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला आज प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमात पश्चिम विदर्भातील अनेक गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, आत्महत्यांचा दर कमी होण्याची अपेक्षा आहे.

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हा राज्यस्तरीय नदीजोड प्रकल्प प्रस्तावित असून या प्रकल्पाव्दारे वैनगंगा नदीवरील भंडारा जिल्हयातील गोसीखुर्द प्रकल्पात पावसाळ्यात उपलब्ध होणारे पाणी वैनगंगा उपखोऱ्यातून तापी खोऱ्यातील बुलढाणा जिल्हयातील नळगंगा प्रकल्पापर्यंत नदीजोड कालव्याद्वारे वळविणे प्रस्तावित आहे. सदर जोड कालव्याची एकूण लांबी ४२६.५२ किमी असून या कालव्याव्दारे विदर्भ प्रदेशातील ६ जिल्हयातील (नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा) १५ तालुक्यांतील एकुण ३,७१,२७७ हे. प्रत्यक्ष सिंचन क्षेत्रास व अप्रत्यक्ष ४-५ लाख हे सिंचनाचा लाभ होणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी सदर पाण्याचा उपयोग करण्याचे नियोजित आहे.

डॉ. महाजन यांनी याबाबत आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “या प्रकल्पाच्या यशामुळे पश्चिम विदर्भाचे नंदनवन होईल. अनेक गावांना, वस्त्यांना आणि वाड्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवता येईल. विशेषतः आत्महत्याग्रस्त भागाला पाणी मिळाल्याने या भागातील परिस्थितीत सुधारणा होईल. याशिवाय, या प्रकल्पाच्या माध्यमात या भागात उद्योगधंदे सुरू होण्याची शक्यता आहे.” डॉ. महाजन यांनी या प्रकल्पाच्या यशासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाचे आभार मानले.

या योजनेच्या जोड कालव्यावर सहा ठिकाणी उपसा प्रस्तावित आहे. ३ नोव्हेंबर २०१४ रोजी मागणी केल्यावर या योजनेसाठी डीपीआर तयार करून ही योजना कार्यान्वित करण्यासाठी शासनाने प्रयत्न करून आज प्रमा जाहीर केला. शासकीय खर्चाने मोठ्या उपसा सिंचन योजना हाती घेण्यासाठी शासन निर्णय दि. २३.११.२०१६ मधील तरतुदीनुसार मा. मुख्यमंत्री महोदयांनी सदर योजना हाती घेण्यास मान्यता दिली आहे. दि. २८.०६.२०२४ रोजी झालेल्या राज्य जल परिषदेच्या ८ व्या बैठकीमध्ये मान्यता मिळाल्यानुसार सदर प्रकल्पाचा समावेश एकात्मिक राज्य जल आराखड्यामध्ये करण्यात आला आहे. वैनगंगा नळगंगा नदीजोड योजनेच्या प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावास मा. राज्यपाल कार्यालयाचे पत्र दि १०.०७.२०२४ अन्वये तत्वतः मान्यता प्राप्त झालेली आहे. या योजनेच्या प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई यांचे पत्र दि.१९.०७.२०२४ अन्वये भाग १ ची कामे हाती घेण्याकरीता प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्याच्या अनुषंगाने तत्वतः मान्यता प्राप्त झाली आहे.

वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्प विदर्भ वासियांसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पामुळे विदर्भातील निर्मित सिंचन क्षमता टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे.

 

वैनगंगा नळगंगा प्रकल्प नकाशा
Wainganga-Nalganga project latest news today
Wainganga-Nalganga project map PDF
Nadi jod prakalp map
Nadi jod prakalp in maharashtra
Wainganga-Nalganga prakalp new update today
Nadi jod prakalp wiki marathi
Nalganga Wainganga project