उत्तराखंड : भूस्खलनामुळे चौघांचा मृत्यू

0
उत्तराखंड : भूस्खलनामुळे चौघांचा मृत्यू
Uttarakhand: Four dead due to landslides

रुद्रप्रयाग:-उत्तराखंडच्या (Uttarakhand) रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये आज, शुक्रवारी मुसळधार पावसानंतर भुस्खलन झाले. यात फांटा हेलिपॅडजवळ ढिगाऱ्याखाली अडकून 4 मजुरांचा मृत्यू झाला. तुल बहादूर, पूर्ण नेपाळी, किष्णा परिहार आणि दीपक बुरा अशी मृतांची नावे असून चौघेही नेपाळी आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंग राजवार यांनी सांगितले की, पहाटे १.२० वाजेच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. ढिगाऱ्यात अडकलेले चारही लोक बचाव पथकाला मृतावस्थेत सापडले आहेत. हे सर्व नेपाळी नागरिक आहेत. त्यांचे मृतदेह जिल्हा आपत्ती बचाव दल (डीडीआरएफ) टीमने रुद्रप्रयाग येथे आणलेत.